investment
investment sakal
Personal Finance

गुंतवणुकीतून सत्पात्री दानाचे पुण्य

सुहास राजदेरकर

एचडीएफसी म्युच्युअल फंडाने ही अडचण दूर केली आहे. नुकतीच त्यांनी एक योजना आणली असून, त्याद्वारे आपण आपल्या गुंतवणुकीतील काही छोटा हिस्सा गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी दान करू शकतो.

- सुहास राजदेरकर

बहुतेकांना समाजातील गरजू, वंचित, दुर्बल घटकांच्या मदतीसाठी दान करण्याची इच्छा असते. असे म्हणतात, की दान हे सत्पात्री असावे. अर्थात, गरजूंना करावे. आपल्या दानाचा उपयोग योग्य व्यक्तीला आणि योग्य कारणासाठी होतो आहे का?

याची खात्री कशी करायची? एचडीएफसी म्युच्युअल फंडाने ही अडचण दूर केली आहे. नुकतीच त्यांनी एक योजना आणली असून, त्याद्वारे आपण आपल्या गुंतवणुकीतील काही छोटा हिस्सा गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी दान करू शकतो.

एचडीएफसी चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर

‘एचडीएफसी चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर’ असे या योजनेचे नाव आहे. ही एक ‘क्लोज एंडेड’ अर्थात बंद होणारी योजना असून, ती २८ जुलै रोजी सुरू झाली असून, आठ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. ही तीन वर्षे कालावधीची ‘एफएमपी’ अर्थात फिक्स्ड मॅच्युरिटी योजना आहे, जी रोखे विभागात येते.

या योजनेमध्ये लाभांश हा फक्त एकच पर्याय आहे, जो योग्य अंतराने दिला जाणार आहे. या लाभांशातील काही रक्कम, कर्करोगग्रस्तांसाठी दिली जाईल. त्यासाठी लाभांशाच्या ५० टक्के किंवा ७५ टक्के असे दोन पर्याय आहेत.

तुम्ही जितकी रक्कम दान कराल तितकीच रक्कम एचडीएफसी म्युच्युअल फंड घालेल आणि दान करेल. यावर त्यांच्यासाठी एका आर्थिक वर्षात १६ कोटी रुपयांची मर्यादा असेल. लाभांश प्रथम गुंतवणूकदारांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

लाभांशावर गुंतवणूकदारांना त्यांच्या उत्पन्न पातळीनुसार प्राप्तिकर द्यावा लागेल. त्यामुळे लाभांशाच्या जास्तीत जास्त ७५ टक्के इतकीच रक्कम दान करता येईल, जेणेकरून प्राप्तिकर खिशातून जाणार नाही.

योजनेमध्ये एकरकमी रक्कमच गुंतविता येणार असून, ‘एसआयपी’ किंवा ‘एसटीपी’ करता येणार नाही. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या इतर योजनेमधून या योजनेमध्ये हस्तांतर करता येईल. योजनेमध्ये कमीतकमी ५०,००० रुपये गुंतवावे लागतील, तर कमाल रकमेवर मर्यादा नाही. योजनेमध्ये प्रत्यक्ष अर्ज भरावा लागणार असून, ऑनलाइन गुंतवणुकीची सोय नाही.

इंडियन कॅन्सर सोसायटीकडे देणगी जमा

अर्ज भरताना, ‘ओटीएम’ अर्थात ‘वन-टाइम-मॅंडेट’ भरावे लागेल ज्यायोगे बँकेला तुमच्या दान रकमेची किमान आणि कमाल मर्यादा समजेल. गुंतवणुकीच्या पाच टक्के अशी किमान रक्कम असेल, जी दर सहा महिन्यांसाठी असेल.

ही रक्कम एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडे जमा न होता, बँक ती परस्पर ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’ला देईल. यामध्ये दान केलेल्या रकमेसाठी प्राप्तिकर ‘कलम ८० जी’ अंतर्गत करामध्ये वजावट मिळणार असली, तरीही सध्याच्या नियमांप्रमाणे ती फक्त जुन्या प्रणालीनुसार प्राप्तिकर भरणाऱ्यांसाठी लागू असेल.

देणगी लाभांशाच्या रकमेतूनच

योजनेसाठी धनादेश लिहिताना ही संपूर्ण रक्कम दान करीत आहात असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु, तसे नसून योजनेवरील लाभांशाच्या ५० टक्के किंवा ७५ टक्के रक्कमच देणगी म्हणून देण्यात येणार आहे. तो साधारणपणे सहा ते आठ टक्के असण्याची शक्यता आहे. तीन वर्षांनी योजना संपल्यावर मुद्दल परत मिळेल. मात्र, त्यावर इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही.

काही ठळक वैशिष्ट्ये

  • या संकल्पनेवरील एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही चौथी योजना.

  • तीन योजनांमधून १८९ कोटी रुपयांचे दान; १३,००० रुग्णांना लाभ

  • प्रत्येक रुग्णामागे ५ लाख रुपयांची मर्यादा

  • ‘बोन-मॅरो’ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी आठ लाख रुपये मर्यादा

  • नियामक मंडळाद्वारे नियमित ऑडिट

  • नियामक मंडळात नवनीत मुनोत, तसेच आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात आदींचा समावेश

महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभांश हा फक्त नफ्याच्या वाटप रकमेमधूनच दिला जातो त्यामुळे ‘मुद्दल’ सुरक्षित रहाण्याची शक्यता आहे. ‘शक्यता’ शब्द अशासाठी, की म्युच्युअल फंड त्यांच्या कोणत्याही योजनेवर मुद्दल अथवा परताव्याची हमी देऊ शकत नाही. परंतु, योजनेमधील एकही पैसा शेअर बाजारामध्ये जाणार नसून, संपूर्ण रक्कम ही चांगल्या ‘एए किंवा ए’ मानांकन असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतविली जाणार आहे.

(लेखक ‘ए३एस’ फायनान्शिअल सोल्यूशन्सचे प्रवर्तक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT