Budget 2024  esakal
Personal Finance

Healthcare Union Budget 2024 : अर्थसंकल्पात कर्करोगाच्या रूग्णांना दिलासा, कॅन्सरची औषधे होणार स्वस्त..!

Pharmaceutical Budget 2024 Announcements from FM Nirmala sitharaman : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी कर्करोगाच्या रूग्णांना दिलासा दिला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी ११ वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सलग ७ वा अर्थसंकल्प आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्राबाबत काही घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कर्करोगाच्या रूग्णांना दिलासा दिला आहे. कॅन्सरच्या ३ औषधांवरील कस्टम ड्युटी मोफत करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून, त्यामुळे, कॅन्सरची औषधे स्वस्त होणार आहेत.

अर्थमंत्र्यांनी केलेली ही घोषणा कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांना मोठा दिलासा देणारी आहे. आता रूग्णांना कॅन्सरसारख्या आजारावर महागड्या औषधांवर जास्त खर्च करण्याची गरज भासणार नाही. या घोषणेमुळे कर्करोगग्रस्तांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, औषधांचे सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर तर्कसंगत आणि सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जातील. या व्यतिरिक्त, खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारावी म्हणून, देशात नव्या 100 लॅब्स उभारल्या जाणार, असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

पुढे अर्थमंत्र्यांनी सांगितले की, उत्पादन कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय एक्स-रे मशिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) मध्ये सुधारणांच्या फ्रेमवर्कमध्ये बदल प्रस्तावित आहेत.

जेणेकरून देशांतर्गत उत्पादनांची क्षमता वाढवणे शक्य होईल. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला संबोधित करताना सांगितले की, 'कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी आणखी तीन औषधांना सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्याचा प्रस्ताव आहे.

त्यासोबतच, मेडिकल एक्स-रे च्या मशिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनेल डिटेक्टरवरील बीसीडीमध्ये ही बदल प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. हे उपक्रम परवडण्यायोग्य करण्यासाठी आणि आरोग्य सेवांमधील सुधारणांसाठी सरकारच्या व्यापक धोरणाचा एक भाग असल्याचे त्यांनी भाषणात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT