Hindenburg Research
Hindenburg Research Sakal
Personal Finance

Hindenburg Research : हिंडेनबर्गचा नवा धमाका, अदानीनंतर आता कोणाबद्दल होणार मोठा खुलासा?

सकाळ डिजिटल टीम

HindenBurg Report After Adani Group :  अदानी समूहाच्या अहवालानंतर हिंडेनबर्गने नवा अहवाल आणण्याचे संकेत दिले आहेत. शॉर्ट सेलिंग फर्मने माहिती दिली आहे की लवकरच दुसरा अहवाल येणार असून त्यात मोठा खुलासा केला जाईल.

हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये अनेक आरोप करण्यात आले होते.

अदानी समुहाच्या हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांची संपत्ती 150 बिलियन डॉलर वरून 53 बिलियन डॉलरवर आली होती.

फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावरून 35 व्या क्रमांकावर गेले आहेत. त्याचवेळी गौतम अदानी यांच्या समूहाला 120 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले.

हिंडेनबर्गने केले ट्विट?

गौतम अदानी यांच्या फर्मबाबत मोठा खुलासा केल्यानंतर आता हिंडेनबर्गने आणखी एक मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहेत.

हिंडेनबर्गने ट्विट करून याबाबत माहिती दिली असून लवकरच एक नवीन अहवाल येत असून या अहवालातून अनेक मोठे खुलासे होणार असल्याचे सांगितले आहे.

हिंडेनबर्ग अहवालाने भारतीय बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे, तर विरोधकांनी आपले सर्व लक्ष अदानी समूह आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्यातील कथित संबंधावर केंद्रित केले.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी फेब्रुवारीमध्ये दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंडेनबर्ग-अदानी वादावर विधीमंडळात प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला होता.

हिंडेनबर्ग याआधी कोणत्या अहवालांबद्दल चर्चेत?

अदानी समूह हा पहिला नाही ज्यावर अमेरिकन फर्मने अहवाल जारी केला आहे. यापूर्वी, अमेरिका, कॅनडा आणि चीनच्या सुमारे 18 कंपन्यांचे स्वतंत्र अहवाल प्रकाशित केले आहेत.

त्यानंतर बराच गोंधळ झाला होता. बहुतेक कंपन्या अमेरिकेतील होत्या, ज्यांना वेगवेगळ्या आरोपांचा सामना करावा लागला.

हिंडनबर्गचा सर्वाधिक चर्चेचा अहवाल निकोला या अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठ्या कंपनीबद्दल होता. या अहवालानंतर निकोलाचे शेअर्स 80 टक्क्यांनी तुटले. निकोलावरील अहवालाने व्हिसलब्लोअर्स आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कथित फसवणूक उघड केली होती.

निकोलाचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष ट्रेवर मिल्टन यांनी तात्काळ कंपनीचा राजीनामा दिला. अहवालानंतर कंपनीची चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT