Hinduja Tax Evasion Case Sakal
Personal Finance

Hinduja Group: 9 महिने तपास, 2,500 कोटींची करचोरी! हिंदुजा ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

Hinduja Tax Evasion Case: हिंदुजा ग्रुपची कंपनी हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स (HGS) वर सुमारे 2,500 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. सुमारे 9 महिने चाललेल्या तपासानंतर आयकर विभागाने अंतर्गत अहवालात हा आरोप केला आहे.

राहुल शेळके

Hinduja Tax Evasion Case: हिंदुजा ग्रुपची कंपनी हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स (HGS) वर सुमारे 2,500 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. सुमारे 9 महिने चाललेल्या तपासानंतर आयकर विभागाने अंतर्गत अहवालात हा आरोप केला आहे.

प्राप्तिकर विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला अंतर्गत अहवाल सादर केला. गेल्या नऊ महिन्यांपासून विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासादरम्यान, प्राप्तिकर विभागाला असे आढळून आले की HGS ने कर चुकवण्यासाठी तोट्यात चालणाऱ्या संस्थेचे विलीनीकरण केले.

हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सने आपला आरोग्यसेवा व्यवसाय बेटेन बीव्हीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांना विकला होता. जो बेअरिंग प्रायव्हेट इक्विटी एशियाशी संबंधित फंड आहे. नंतर हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सचा डिजिटल मीडिया आणि कम्युनिकेशन व्यवसाय युनिट NXT डिजिटलमध्ये विलीन करण्यात आला.

आयकर विभागाचे म्हणणे आहे की, एनएक्सटी डिजिटल ही तोट्यात चालणारी कंपनी होती आणि हे विलीनीकरण पूर्णपणे कर वाचवण्यासाठी करण्यात आले होते.

इकॉनॉमिक टाइम्सने आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, तपास पूर्ण झाला आहे. विलीनीकरणाचा उद्देश केवळ कर वाचविण्याचा होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

दुसरीकडे, कंपनीने अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. कंपनीचे असे मत आहे की ज्या विलीनीकरणाबाबत बोलले जात आहे ते पूर्णपणे नियम आणि कायद्यानुसार झाले आहे.

विलीनीकरणाबाबत गेल्या वर्षी आयकर विभागाच्या सर्वेक्षणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कंपनीने त्यांना उत्तर देत आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतर कंपनीला अद्याप कोणतीही मागणी नोटीस मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT