Hindustan Unilever limited sakal
Personal Finance

Hindustan Unilever limited : हिंदुस्तान युनिलिव्हरचा नफा आणि महसूल वाढला

एफएमसीजी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी 'हिंदुस्तान युनिलिव्हर'ला एप्रिल ते जून या तिमाहीत १५,३३३ कोटी रुपयांचा महसूल तर २,४७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एफएमसीजी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी 'हिंदुस्तान युनिलिव्हर'ला एप्रिल ते जून या तिमाहीत १५,३३३ कोटी रुपयांचा महसूल तर २,४७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

कंपनीने आज आपले तिमाही निकाल जाहीर केले. त्यांच्या महसुलात मागील वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा ६.४ टक्के वाढ झाली. मागील वर्षी त्यांना १४,०१६ कोटी रुपये महसूल मिळाला होता. तर त्यांचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाही पेक्षा आठ टक्के वाढला. मागील वर्षी त्यांना २,२८९ कोटी रुपये नफा मिळाला होता.

मात्र यावर्षीच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीपेक्षा त्यांचा या तिमाहीतील नफा १० टक्के कमी झाला. जानेवारी ते मार्च या तिमाहीत त्यांना २,५५२ कोटी रुपये नफा झाला होता. त्यांचा नफा आणि महसूल हा अंदाजापेक्षा किंचित कमी झाला. कंपनीची देशांतर्गत विक्री मागील वर्षीपेक्षा तीन टक्के जास्त झाली. मात्र ती देखील तज्ञांच्या अंदाजापेक्षा कमीच होती.

देशातील एफएमसीजी क्षेत्राची आता हळूहळू वाढ होत आहे, मात्र अद्यापही वातावरण सर्वार्थाने चांगले झाले नाही. मध्यम ते दीर्घ कालावधीत देशातील एफएमसीजी क्षेत्र आणि हिंदुस्थान युनिलिव्हर सातत्यपूर्ण नफा नोंदवेल, असे कंपनीचे सीईओ आणि एमडी रोहित जावा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT