RBI Report Sakal
Personal Finance

RBI Report: स्वातंत्र्यानंतर कर्जामध्ये सर्वाधिक वाढ, बचतीमध्ये मोठी घट, RBI चा धक्कादायक अहवाल

RBI Report: रिझर्व्ह बँकेने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे.

राहुल शेळके

RBI Report: भारतीय रिझर्व्ह बँकेने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार भारतीय कुटुंबांची आर्थिक बचत 2022-23 मध्ये (जीडीपीच्या) 5.1 टक्क्यांच्या 50 वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे. रुपयांमध्ये ही बचत 13.77 लाख कोटी रुपये आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये कुटुंबांची आर्थिक बचत 7.2 टक्के किंवा 16.96 लाख कोटी रुपये होती. कोरोना काळात बचत 2020-21 मध्ये 11.5 टक्के (22.8 लाख कोटी) आणि 2019-20 मध्ये 8.1 टक्के होती.

भारतीय कुटुंबांवरील कर्जाचे ओझेही वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 2022-23 मध्ये कुटुंबांची कर्जे जीडीपीच्या 5.8 टक्क्यांपर्यंत वाढली, तर 2021-22 मध्ये हा आकडा 3.8 टक्के होता. याचा अर्थ उपभोगाचा काही भाग कर्जातून भागवला जात होता.

स्वातंत्र्यानंतर कर्जामध्ये सर्वाधिक वाढ

2022-23 मध्ये कर्जामध्ये वाढीचा दर हा स्वातंत्र्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. यापूर्वी 2006-07 मध्ये त्यात वाढ झाली होती. त्यावेळी कर्जाचा वाढीचा दर 6.7% होता. देशांतर्गत कर्ज देखील 2022-23 मध्ये GDP च्या 37.6% आहे, जे मागील वर्षी 36.9% होते. कोरोना काळात बचत जास्त राहिली कारण त्या काळात लोकांनी आपले खर्च कमी केले होते.

व्यावसायिक बँकांचे कर्ज 54 टक्क्यांनी वाढले

RBI च्या मते, 2022-23 मध्ये वार्षिक आधारावर व्यावसायिक बँकांच्या कर्जामध्ये 54 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत जीडीपीच्या तुलनेत लोकांची संपत्ती 10.9% इतकी आहे. 2021-22 मध्ये संपत्ती 11 टक्क्यांहून अधिक होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT