PPF Claim
PPF Claim  google
Personal Finance

PPF Claim : मॅच्युरिटीपूर्वीच पीपीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारसदारांना कशी मिळेल जमा रक्कम ?

नमिता धुरी

मुंबई : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी मोठा निधी तयार करू शकता.

केंद्र सरकार देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना आणत असते. त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय योजनेचे नाव आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नोकरी नसतानाही पीएफ खात्याचा लाभ मिळू शकतो. (how nominees will get PPF amount if account holder dies before maturity date )

या योजनेत एकूण १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत व्याजदरासह कर सवलतीचा लाभ मिळतो.

प्रत्येक आर्थिक वर्षात कोणताही खातेदार ५०० ते १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर दावा करू शकता.

पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर, सरकार चक्रवाढ आधारावर ७.१० टक्के व्याजदर देत आहे. तुम्ही ३ वर्षांनंतर खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर्ज देखील घेऊ शकता.

जर एखाद्या PPF खातेधारकाचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला, तर नॉमिनी खात्यात जमा केलेल्या पैशावर दावा करू शकतो आणि ते काढू शकतो. मृत्यूच्या दाव्याच्या बाबतीत १५ वर्षे प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

जर दाव्याची रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर नॉमिनीला फक्त मृत्यू दावा फॉर्म भरावा लागेल आणि मृत्यू प्रमाणपत्र दाखवावे लागेल. दुसरीकडे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर, मृत्यू प्रमाणपत्रासह, न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र इत्यादी काही कायदेशीर पुरावे देखील आवश्यक असू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT