SIP Investment Sakal
Personal Finance

SIP Investment: फक्त 2,000 रुपयांची एसआयपी तुम्हाला बनवू शकते श्रीमंत; इतकी वर्ष करावी लागेल गुंतवणूक

SIP Investment: सध्याच्या काळात आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैसा असणं आवश्यक आहे. प्रत्येकालाच वाटतं की लवकरात लवकर जास्त पैसा मिळावा, मोठं घर, गाडी आणि सुखसुविधांनी भरलेलं आयुष्य जगता यावं.

राहुल शेळके

SIP Investment: सध्याच्या काळात आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैसा असणं आवश्यक आहे. प्रत्येकालाच वाटतं की लवकरात लवकर जास्त पैसा मिळावा, मोठं घर, गाडी आणि सुखसुविधांनी भरलेलं आयुष्य जगता यावं. पण बहुतांश लोकांचं उत्पन्न मर्यादित असतं आणि ते सगळे पैसे कधी घरखर्चात, कधी कर्जाच्या हप्त्यात, तर कधी वैद्यकीय गरजांमध्ये खर्च करतात.

मात्र, आर्थिक साक्षरता आणि शिस्तबद्ध गुंतवणूक असेल तर अगदी महिन्याला फक्त 2000 रुपये वाचवले तरीही भविष्यात श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 2000 रुपये वाचवून ते SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवत असाल, आणि या गुंतवणुकीवर दरवर्षी 12% परतावा मिळाला, तर 25 वर्षांनी ही छोटी रक्कम तब्बल ₹32 लाखांवर जाऊ शकते. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक फक्त ₹6 लाख असेल, आणि व्याजाद्वारे तुम्हाला ₹28 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल.

चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक वालिया सांगतात की, 32 लाख रुपये ही रक्कम आकर्षक वाटते, पण ही तुमच्या आयुष्याच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी नाही. त्यांच्या मते SIP ही ए‘ध्येय’ ठेऊन करायला हवी.

वालिया यांचा सल्ला असा आहे की, कोणतीही SIP सुरू करताना आधी आपलं ध्येय ठरवा. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतील का? निवृत्तीनंतरचा खर्च, इमरजन्सी फंड, किंवा घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट? या प्रत्येक गोष्टीसाठी किती रक्कम लागेल, ते ठरवा आणि मग त्या ध्येयानुसार SIP सुरू करा.

थोडक्यात काय तर SIP म्हणजे ‘जादूची कांडी’ नाही. SIP म्हणजे सातत्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीचं फलित आहे. त्यामध्ये तुमचं लक्ष्य, वेळ, आणि योग्य परतावा या सगळ्यांचा मेळ साधावा लागतो. त्यामुळे, जर तुम्ही खरंच श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहत असाल, तर आजपासून बचत सुरू करा, गुंतवणुकीला शिस्त लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संतापजनक! शिक्षणाच्या नावाखाली विकृतीचा कळस; नोट्स देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार

लवकरच लाँच होतोय Realme 15 Pro 5G स्मार्टफोन; ब्रँड कॅमेरा, दमदार AI फीचर्स अन् किंमत फक्त..

Save Battery Phone: तुमच्या स्मार्टफोनच्या 'या' सेटिंग्ज बदलून बॅटरी अन् डेटा कसा वाचवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप पद्धत

Rupee Symbol: रुपयाचं चिन्ह कोणी डिझाइन केलं? दोन आर्किटेक्टची कहाणी; एकाला प्रसिद्धी मिळाली, तर दुसरा...

त्या एका घटनेनंतर राज ठाकरेंचे निलेश साबळेला तब्बल 17 मिस्डकॉल्स, असं काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT