करप्रणाली जुनी की नवी? Sakal
Personal Finance

करप्रणाली जुनी की नवी?

साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये, कंपन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या करबचतीच्या गुंतवणुकीचे तपशील विचारू लागतात.

सकाळ वृत्तसेवा

- प्रणव मंत्री

साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये, कंपन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या करबचतीच्या गुंतवणुकीचे तपशील विचारू लागतात. त्याचबरोबर जुनी की नवी करप्रणाली निवडत आहात? असेही विचारले जाते. ही निवड करणे कठीण ठरू शकते. कारण, जुन्या आणि नव्या करप्रणालीची तुलना करणे क्लिष्ट वाटू शकते. तुम्ही पद्धतशीरपणे अभ्यास केलात, तर हे सुलभ होऊ शकेल.

करप्रणाली निवडीसाठी

सर्व सवलतींची गणना करा : तुम्ही भाड्याने राहात असाल, तर तुम्ही पगारातील सर्वांत मोठ्या सवलतींपैकी एक असलेल्या घरभाडे भत्त्यासाठी (एचआरए) दावा करू शकता. इतर करमुक्त घटकांमध्ये एलटीए, जेवणखाणाची बिले, फोन बिले आदींचा समावेश आहे. नव्या करप्रणालीमध्ये हे सर्व करपात्र होईल. तुम्हाला जुन्या; तसेच नव्या नियमांमध्ये डीफॉल्टनुसार मानक वजावट मिळेल.

कपातीकडे लक्ष द्या : जुन्या प्रणालीत कलम ८०सी अंतर्गत अनेक वजावटी उपलब्ध असून, यात गृहकर्जाचे व्याज समाविष्ट आहे. नव्या करप्रणालीमध्ये तुम्हाला कोणतीही वजावट मिळणार नाही.

आता तुमची सर्व कपात आणि सूट एकत्रित करून उत्पन्नातून ते कमी करा आणि करपात्र उत्पन्न शोधा. हे भत्ते आणि कपात न करतादेखील करपात्र उत्पन्न शोधा. उत्पन्न आणि कराचे दर दोन्हींचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वोत्तम उपाय शोधा. वैकल्पिकरीत्या, दोन्ही शासनांतर्गत तुमचा देय कर मोजण्यासाठी तुम्ही प्राप्तिकर कॅल्क्युलेटरदेखील वापरू शकता आणि तुमच्यासाठी कोणती व्यवस्था अधिक योग्य आहे? हे ठरवू शकता.

ही चूक टाळा

जुनी करव्यवस्था निवडू नका आणि नंतर कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करू नका. कर वाचविणे आनुषंगिक आहे. गुंतवणूक, विमा खरेदी, देणगी हे फक्त करबचतीसाठी करू नये. तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे ही तुमच्या गुंतवणुकीची कारणे असली पाहिजेत, करलाभ नव्हे.

कोणती करप्रणाली निवडायची हे निश्चित नसले तरीही आणि डिफॉल्ट म्हणजे नवी व्यवस्था सक्रिय झाली, तरी काळजी करू नका. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना तुमच्याकडे कोणती पद्धत निवडायची याचा पर्याय असतो. मात्र, तुम्ही तुमच्या नियोक्त्याला माहिती दिली नाही, तर डिफॉल्टनुसार तुम्हाला नवी करप्रणाली लागू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT