Online ITR Filing Sakal
Personal Finance

ITR Filing: तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Online ITR Filing: आर्थिक वर्ष 2024-25 साठी ITR भरण्याची वेळ सुरू झाली आहे. आयकर विभागाने 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. अशा स्थितीत तुमच्याकडे फारसा वेळ नाही.

राहुल शेळके

Online ITR Filing: तुम्ही पगारदार कर्मचारी आहात का? जर असाल तर कंपनीने तुम्हाला फॉर्म 16 जारी केला असेल, ज्याद्वारे आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरणे खूप सोपे होते. आर्थिक वर्ष 2024-25 साठी ITR भरण्याची वेळ सुरू झाली आहे. आयकर विभागाने 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. अशा स्थितीत तुमच्याकडे फारसा वेळ नाही.

घरी बसून आयटीआर ऑनलाइन कसा भरायचा? यासाठी तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. सीए किंवा तज्ञांच्या मदतीशिवाय तुम्ही तुमचा आयटीआर स्वतः भरू शकता.

ही कागदपत्रे आधी तयार ठेवा

आयटीआर ऑनलाइन भरण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड

  • बँक खाते तपशील

  • फॉर्म 16

  • TDS प्रमाणपत्र

  • कर कपातीचा दावा करण्यासाठी गुंतवणुकीचा पुरावा

  • बँका आणि पोस्ट ऑफिस इत्यादींकडून मिळालेल्या व्याजाचा पुरावा.

आयकर रिटर्न ऑनलाइन कसे भरायचे?

  • आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जा https://www.incometax.gov.in/iec/foportal/

  • येथे ई-फायलिंग पोर्टलवरील लॉगिन बटणावर क्लिक करा.

  • तुमचा पॅन क्रमांक आणि जन्मतारीख (D.O.B.) टाका आणि Continue बटणावर क्लिक करा

  • आता तुमचा पासवर्ड टाका आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.

Online ITR Filing
  • तुमच्या ई-फायलिंग खात्यात लॉग इन केल्यानंतर, डॅशबोर्डवर क्लिक करा.

  • येथे "ई-फाइल" > "इन्कम टॅक्स रिटर्न"> "फाइल इन्कम टॅक्स रिटर्न" वर क्लिक करा.

  • रिटर्न भरण्यासाठी आयटीआर फॉर्म निवडा आणि तपशील भरा.

  • तुमचे उत्पन्न (Income), वजावट (Deduction) आणि करपात्र उत्पन्नाचे (Taxable Income) तपशील भरा.

Online ITR Filing
  • असे तपशील टाकल्यानंतर, कर दायित्व (Payable Tax) मोजले जाईल.

  • तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन कर भरू शकता.

  • आधार क्रमांक आणि  ई-साइनचा वापरून ITR रिटर्न तपासा.

Online ITR Filing
  • काही चूक असल्यास ती दुरुस्त करून सबमिट बटणावर क्लिक करा.

  • तुमचा ITR सबमिट केल्यावर, त्याची पावती डाउनलोड करा आणि ती तुमच्या रेकॉर्डसाठी ठेवा.

  • त्यात दिलेल्या पावती क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या ITR ची स्थिती पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT