Hurun India Rich List 2023 Sakal
Personal Finance

Hurun India Rich: श्रीमंतांच्या यादीत अंबानींनी अदानींना टाकले मागे, संपत्तीत झाली 4 पट वाढ

Hurun India Rich List 2023: हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.

राहुल शेळके

Hurun India Rich List 2023: मुकेश अंबानींनी आता गौतम अदानींना श्रीमंतांच्या यादीत मागे टाकले आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.

हुरुन इंडिया आणि 360 वन वेल्थ यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 अहवालात भारतातील अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुकेश अंबानी कुटुंब 8,08,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानींची संपत्ती 4 पटीने वाढली

मुकेश अंबानी यांची संपत्ती 2014 मध्ये 1,65,100 कोटी रुपयांवरून 2023 मध्ये अंदाजे 8,08,700 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या 9 वर्षात अंबानींच्या संपत्तीत चार पटींनी वाढ झाली आहे.

गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 4,74,800 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला 2,78,500 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

एचसीएलचे शिव नाडर 2,28,900 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर 1,76,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसह गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबाचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप सांघवी 1,64,300 कोटी रुपयांसह सहाव्या स्थानावर आहेत.

आर्सेलर मित्तलच्या लक्ष्मी मित्तलच्या संपत्तीत 7% वाढ झाली आहे आणि त्या आता 1,62,300 कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह यादीत सातव्या स्थानावर आहे. डीमार्टचे राधाकिशन दमानी हे 1,43,900 कोटी रुपयांच्या संपत्तीसह यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. कुमार मंगलम बिर्ला कुटुंब 1,25,600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT