Byju Raveendran  sakal
Personal Finance

Byju Raveendran : ‘मीच कंपनीचा सीईओ’ ; बायजूज कंपनीच्या रवींद्रन बायजू यांचे स्पष्टीकरण

शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनी बायजूजच्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे नेतृत्व रवींद्रन बायजू यांच्याकडून काढून घ्यावे, या बाजूने भागधारकांनी सर्वाधिक मतदान केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनी बायजूजच्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे नेतृत्व रवींद्रन बायजू यांच्याकडून काढून घ्यावे, या बाजूने भागधारकांनी सर्वाधिक मतदान केल्याचा दावा करण्यात आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहून आपणच कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) अद्याप कायम आहोत, असे स्पष्ट केले आहे.

सहा मुख्य गुंतवणूकदारांनी व भागधारकांनी शुक्रवारी (ता.२३) घेतलेली सर्वसाधारण सभा बेकायदा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सभेत संस्थापक-सीईओ रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबाला कथित गैरव्यवस्थापन आणि अपयश या कारणावरून संचालक मंडळातून काढून टाकण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यात ६० टक्के मतदान रवींद्रन यांच्या विरोधात झाल्याचे सभा आयोजित करणाऱ्या गुंतवणूकदारांनी म्हटले आहे. मात्र, रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात याचे खंडन केले असून, या सर्वसाधारण सभेत अनेक आवश्यक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

किमान एका संस्थापक संचालकाची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, या बैठकीत एकही संचालक नव्हता. त्यामुळे या सभेत मंजूर झालेले कोणतेही ठराव कायद्यानुसार लागू होणार नाहीत. या सभेत १७० भागधारकांपैकी केवळ ३५ भागधारकांनी याच्या बाजूने मतदान केले. असेही त्यांनी म्हटले आहे. सत्याचा विजय होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे. कंपनीचा सीईओ म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. तुम्ही माध्यमांद्वारे जे समोर येत आहे, तसे काहीही झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सत्याचा विजय होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे. कंपनीचा सीईओ म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. माध्यमांद्वारे जे समोर येत आहे, तसे काहीही झालेले नाही. कंपनीच्या व्यवस्थापनात बदल झालेले नाहीत. अफवांवर विश्‍वास ठेवू नका.

- रवींद्रन बायजू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT