GST Tax Sakal
Personal Finance

GST Tax: धक्कादायक! विमा कंपन्यांनी बनावट खर्च दाखवून केली 30,000 कोटी रुपयांची करचोरी

GST Tax Evasion: 1 जुलै 2017 पासून 30,000 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा विमा कंपन्यांवर आरोप आहे.

राहुल शेळके

GST Tax Evasion: 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाला. अनेक विमा कंपन्या आणि त्यांच्या मध्यस्थांवर 1 जुलै 2017 पासून 30,000 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. या कंपन्यांवर त्यांचे उत्पन्न कमी नोंदवल्याचा आणि खोटे खर्च दाखवल्याचा आरोप आहे.

प्राप्तिकर विभागाने कराचे मुल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे आणि थकित कराच्या वसुलीसाठी कंपन्यांना डिमांड नोटीस पाठवणे सुरू केले आहे. याशिवाय थकीत रकमेवर व्याज आणि दंडही आकारण्यात येणार आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, थकबाकी वसूल करण्यासाठी या संस्थांना टॅक्स डिमांड नोटीस पाठवली जाईल. मात्र, व्याज आणि दंड आकारल्यानंतर ही रक्कम आणखी वाढणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दंड आणि दंडासह मागणी नोटीस पाठवत आहोत. कंपन्यांना मुदतीत उत्तर देणे बंधनकारक आहे.

चुकीचा खर्च दाखवून जीएसटी भरला

किती व्याज आणि दंड आकारायचा याचा निर्णय कर अधिकारी घेतील. गेल्या वर्षी आयकर विभागाने जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या सहकार्याने तपास सुरू केला होता. काही विमा कंपन्या नियम डावलून जास्त खर्च दाखवत चुकीचे बिल देत असल्याची माहिती मिळाली.

कंपन्यांकडून हा वाढीव खर्च दाखवण्यात आल्याने आयकर विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. दुसर्‍या अधिकाऱ्याने सांगितले की, बनावट CSR खर्च दाखवण्यात आला. त्याचबरोबर जाहिराती आणि खर्च जास्तीचा दाखवण्यात आला आहे.

30 विमा कंपन्यांचा सहभाग

करचोरी प्रकरणात 30 विमा कंपन्या, 68 टॅक्स एजंट आणि मध्यस्थांचा सहभाग आहे. यासोबतच काही बँकांचाही सहभाग होता, ज्या विमा कंपनीसाठी मध्यस्थ म्हणून काम करत आहेत. लवकरच त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT