ICC World Cup 2023 Sakal
Personal Finance

ICC World Cup 2023: वर्ल्ड कपच्या जाहिरातींवर किती कोटींची होणार उधळण? सर्वाधिक वाटा कोणत्या कंपन्यांचा?

ICC World Cup 2023: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा महासंग्राम आजपासून सुरू होत आहे.

राहुल शेळके

ICC World Cup 2023: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा महासंग्राम आजपासून सुरू होत आहे. या वर्ल्ड कपमधून जाहिरातींचे उत्पन्न 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात जाहिरातींच्या खर्चात 15 टक्के वाढ होण्याची अपेक्षा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वर्ल्ड कप 2023 चा पहिला सामना गतविजेता संघ इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

दसरा-दिवाळीच्या काळात होणाऱ्या क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांमुळे जाहिरातदारांची उत्सुकता वाढल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तुलनेत यावर्षी क्रिकेट वर्ल्ड कपच्या जाहिरातींवरील खर्च दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

वर्ल्ड कपमुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार 5 ऑक्टोबरपासून सुरू होणारी वर्ल्ड कप स्पर्धा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे. सुमारे दीड महिन्यांच्या या कालावधीत एकूण प्रेक्षकांची संख्या एक कोटीच्या पुढे जाईल.

वर्ल्ड कप भारतात होणार असल्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने भारतीय असणार आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी लोकांच्या या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी अनेक जागतिक कंपन्यांसाठी क्रिकेट वर्ल्ड कप ही एक मोठी संधी आहे.

जाहिरातींवर किती खर्च होणार?

कंपन्यांना 10 सेकंदांच्या स्लॉटसाठी 30 लाख रुपये खर्च करावे लागतील. गेल्या वर्ल्ड कपच्या तुलनेत हे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले आहे.

दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च होतात

सर्व ब्रँड्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जाहिरात स्लॉट मिळविण्यासाठी 240 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 2,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याचे मोठे कारण म्हणजे 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतातील क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे.

संशोधन फर्म जेफरीजच्या मते, दरवर्षी कंपन्या क्रिकेटवर जाहिरात आणि प्रायोजकत्व इत्यादींवर 1.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करतात, जे भारतातील एकूण क्रीडा खर्चाच्या 85 टक्के इतके आहे.

कोणत्या कंपन्यांचा समावेश?

वर्ल्ड कप दरम्यान जाहिरातींवर खर्च करणाऱ्या जागतिक ब्रँड्समध्ये Coca-Cola कंपनी, Alphabet Inc, Google Pay, Unilever Plc चे भारतीय युनिट हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, सौदी आरामको, एमिरेट्स आणि निसान मोटर कंपनी यासारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT