Chanda Kochhar Sakal
Personal Finance

Chanda Kochhar: चंदा कोचर यांच्यामुळे ICICI बँकेला 1,033 कोटींचे नुकसान, CBI ने दाखल केली 10 हजार पानांची चार्टशीट

Chanda Kochhar: दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठी बाब समोर आली आहे.

राहुल शेळके

Chanda Kochhar: ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात एक मोठी बाब समोर आली आहे.

ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला दिलेले 1,000 कोटी रुपयांहून अधिक नॉन परफॉर्मिंग अॅसेट (NPA) झाले आहे. जेव्हा कर्जदार रक्कम परत करू शकत नाही, तेव्हा बँकेचे पैसे अडकतात आणि नंतर बँक एनपीए म्हणून घोषित करते.

10 हजार पानांची चार्टशीट

10,000 हून अधिक पानांच्या आरोपपत्रात केंद्रीय एजन्सीने चंदा कोचर बँकेच्या MD आणि CEO बनल्यानंतर 1 मे 2009 पासून व्हिडिओकॉन समूहाला मुदत कर्जे (RTL) मंजूर केल्याचा आरोप आहे.

आरोपपत्रात असे म्हटले आहे की जून 2009 ते ऑक्टोबर 2011 दरम्यान, बँकेने व्हिडिओकॉन समूहाला एकूण 1,875 कोटी रुपयांचे मुदत कर्जे (RTL) मंजूर केले होते.

चंदा कोचर या दोन सदस्यीय संचालक समितीच्या अध्यक्षा होत्या ज्यांनी ऑगस्ट 2009 मध्ये व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (VIEL) ला 300 कोटी रुपयांचे मुदत कर्जे (RTL) मंजूर केली होती.

एजन्सीने पुढे सांगितले की, 26 ऑगस्ट 2009 रोजी, कोचर यांच्या अध्यक्षतेखालील संचालकांच्या समितीने व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 300 कोटी रुपये मंजूर केले. कर्जाची रक्कम 7 सप्टेंबर 2009 रोजी वितरित करण्यात आली.

5 कोटींचे घर 11 लाखांना हस्तांतरित

दीपक कोचर हे व्हिडीओकॉन समूहाच्या मालकीच्या मुंबईतील सीसीआय चेंबर्स येथील फ्लॅटमध्ये राहत असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. चंदा कोचर व्हिडिओकॉन समूहाच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहात होत्या आणि नंतर हा फ्लॅट त्यांच्या कौटुंबिक ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आला.

त्या ट्रस्टचे व्यवस्थापक विश्वस्त दीपक कोचर आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये 11 लाख रुपयांच्या तुटपुंज्या रकमेत फ्लॅट हस्तांतरित करण्यात आला, तर 1996 मध्येच फ्लॅटची किंमत 5.25 कोटी रुपये होती.

बँकेचे 1,033 कोटींचे नुकसान

आरोपपत्रात असे म्हटले आहे की ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला मंजूर केलेल्या क्रेडिट सुविधा जून 2017 मध्ये NPA झाल्या. यामध्ये 1,033 कोटी रुपयांची थकबाकी होती.

यामुळे आयसीआयसीआय बँकेला 1,033 कोटी रुपयांचे नुकसान आणि व्याज सहन करावे लागले. या प्रकरणातील सर्व आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर असून या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख 29 ऑगस्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: लालपरीच्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच! एसटी स्थानकांवर २४ तास देखरेख; प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Vani Car Accident : वणी-नांदुरी रस्त्यावर दोन कारची समोरासमोर भीषण धडक; ८ भाविक जखमी...

JEE Main 2026 Exam Result: जेईई मेन निकाल जाहीर; 96.26% विद्यार्थ्यांची उपस्थिती, 12 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 पर्सेंटाइल

Nagpur : वाचन संस्कृतीला हरताळ! नागपुरात १४ वाचनालयांना लागले टाळे, जिल्ह्यातील आकडा ३१ वर, कारण काय?

Latest Marathi News Live Update : भाईंदरात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार, मनसेचा आक्रमक पवित्र्याने आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT