ICICI Lombard partnership with Capital Small Bank Sakal
Personal Finance

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ची ‘कॅपिटल स्मॉल’ बँकेशी भागीदारी

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ला ग्राहकाभिमुख व नाविन्यपूर्ण विमा योजना ग्राहकांना सादर करणे शक्य होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विमा कंपनी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने देशातील पहिली लघु वित्त बँक असलेल्या कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेशी बँक इन्शुरन्स कॉर्पोरेट एजन्सीसाठी सहकार्य करार केला आहे. बँकेच्या वित्तीय पर्यायांचा अधिकाधिक विस्तार करणे आणि ग्राहकांना सर्वसाधारण विमा योजनांची वैविध्यपूर्ण श्रेणी प्रदान करणे आहे, हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ला ग्राहकाभिमुख व नाविन्यपूर्ण विमा योजना ग्राहकांना सादर करणे शक्य होणार आहे. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक या भागीदारीआधारे आरोग्य, वाहन, घर, प्रवास आणि ग्रामीण विमा यासह ‘आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सर्वसमावेशक विमा योजनांच्या प्रकारांचे वितरण करण्यासाठी आपले विस्तृत बँकींग जाळे तसेच विस्तृत ग्राहकसंख्येच्या आधाराचा लाभ घेणार आहे.

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चे रिटेल आणि गर्व्हमेंट विभागाचे प्रमुख आनंद सिंघी आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ सर्वजित सिंग समरा यांनी ही धोरणात्मक भागीदारी दोन्ही संस्थांना लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT