IIT Bombay placements 36 percent students from latest batch fail to get placed Sakal
Personal Finance

IIT Bombay: धक्कादायक! आता IIT मध्येही नोकरीची गॅरंटी नाही; 36 टक्के विद्यार्थी नोकरीपासून वंचित

IIT Bombay Placements: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT बॉम्बे) च्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. सध्या आयआयटी बॉम्बेमध्ये प्लेसमेंट सुरू आहे, ज्यामध्ये देश-विदेशातील नामांकित कंपन्यांनी भाग घेतला आहे.

राहुल शेळके

IIT Bombay Placements: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT बॉम्बे) च्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. सध्या आयआयटी बॉम्बेमध्ये प्लेसमेंट सुरू आहे, ज्यामध्ये देश-विदेशातील नामांकित कंपन्यांनी भाग घेतला आहे. प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेल्या 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरीच्या ऑफर मिळाल्या नसल्याची बातमी आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, आयआयटी बॉम्बेच्या 2000 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी सुमारे 712 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली नाही. ग्लोबल आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंग यांनी हा डेटा शेअर केला आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये सध्या प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू आहे जी मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग शाखेला सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी या शाखेतील विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट मिळते. मात्र या शाखेतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या वर्षी आयआयटी बॉम्बेतील 32.8 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. आतापर्यंत प्लेसमेंट मिळवू न शकलेल्या अशा विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा 2.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2,209 विद्यार्थ्यांपैकी 1,485 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे.

अहवालात म्हटले आहे की आयआयटी-बॉम्बेच्या प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जागतिक आर्थिक मंदीमुळे प्लेसमेंटसाठी कंपन्यांना कॉल करणे कठीण झाले आहे.

आयआयटी बॉम्बेतील प्लेसमेंट बाबत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, आता अशा संस्थाही बेरोजगारीच्या विळख्यात आल्या आहेत. आयआयटीसारख्या ठिकाणी प्लेसमेंट होत नसताना इतर संस्थांची काय अवस्था असेल याची कल्पना करा.

हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालाचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, आयआयटीसारख्या सर्वोच्च संस्थाही आता बेरोजगारीला बळी पडल्या आहेत. गेल्या वर्षी 32% विद्यार्थी आणि यावर्षी 36% विद्यार्थींची IIT बॉम्बेमध्ये प्लेसमेंट झाली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत.

देशातील सर्वात प्रतिष्ठित टेक्निकल इन्स्टिट्यूटची ही स्थिती असेल, तर भाजपने संपूर्ण देशाची काय स्थिती केली आहे, याची कल्पना करा, असे राहुल म्हणाले. काँग्रेसने युवकांसाठी रोजगार योजना देशासमोर मांडून जवळपास एक महिना उलटला तरी भाजप सरकारने या प्रश्नावर काहीही भूमिका घेतलेली नाही.

नरेंद्र मोदींकडे रोजगार देण्याचे कोणतेही धोरण किंवा हेतू नाही, ते देशातील तरुणांना भावनिक प्रश्नांच्या जाळ्यात अडकवून फसवत आहेत. अशी अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

Viral Video : तुम्हीही नाश्त्यात पोहे आवडीने खाता ? व्हायरल व्हिडिओ पाहून उघडतील डोळे

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Latest Marathi News Live Update : सातारा नगरपरिषदेच्या ‘अघोरी नृत्या’ला अंनिसचा विरोध

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT