imf predict raise in gdp india development rate 6 8 percent possibility Sakal
Personal Finance

GDP : ‘आयएमएफ’ने वाढविला ‘जीडीपी’ अंदाज; भारताचा विकासदर ६.८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आर्थिक वर्ष २०२५ साठी भारताच्या वाढीचा (जीडीपी) अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आर्थिक वर्ष २०२५ साठी भारताच्या वाढीचा (जीडीपी) अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. देशांतर्गत मागणीची चांगली स्थिती आणि कामाच्या वयाची वाढती लोकसंख्या यामुळे जानेवारीत वर्तविलेल्या ६.५ टक्क्यांच्या अंदाजात ३० आधारभूत अंकांची वाढ करण्यात आली आहे.

या कालावधीत चीनच्या वाढीचा अंदाज ४.६ टक्के राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जागतिक आर्थिक अंदाज अहवाल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

भारताच्या ‘जीडीपी’ वाढीचा दर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६.८ टक्के आणि २०२५-२६ मध्ये ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. यातून देशांतर्गत मजबूत मागणी आणि कामाच्या वयोगटातील लोकसंख्येचे सामर्थ्य प्रतिबिंबित होते, असेही या अहवालात म्हटले आहे.

त्याच वेळी, उदयोन्मुख आणि विकसनशील आशियातील देशांच्या वाढीचा दर २०२३ मधील अंदाजे ५.६ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ५.२ टक्के आणि २०२५ मध्ये ४.९ टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. चीनमधील वाढ २०२३ मध्ये ५.२ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ४.६ टक्के आणि २०२५ मध्ये ४.१ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे, तर जागतिक वाढीचा वेग २०२४ आणि २०२५ मध्ये ३.२ टक्केच राहील, असा अंदाज आहे.

अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कमी राहण्याचा अंदाज आहे. महागाईशी लढण्यासाठी अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवल्यामुळे मंदीची धोका कायम आहे. अशा परिस्थितीतही जागतिक अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या लवचिक राहिली आहे. मात्र, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे, असे नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे

  • भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

  • चीनच्या वाढीचा अंदाज ४.६ टक्के

  • जागतिक वाढीचा वेग २०२४ व २०२५ मध्ये ३.२ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naval Kishor Ram : कितीही मोठा अधिकारी असला तरी कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये सर्वात मोठा बदल! पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार, फक्त 'या' गोष्टीवरून तुमची ओळख पटणार

Pune News : नवले पूल येथे तातडीने उपाययोजना करा; नितीन गडकरींचे आदेश

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

SCROLL FOR NEXT