Impact of RBI Scrutiny, Paytm Decided to Separate from Paytm Payment Bank Sakal
Personal Finance

PPBL Crisis: आरबीआयच्या कारवाईचा परिणाम! पेटीएम आणि पेटीएम पेमेंट बँक होणार वेगळे, काय आहे कारण?

Paytm Payment Bank: सुमारे एक महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमच्या पेमेंट बँकेला 29 फेब्रुवारीनंतर काम करण्यास बंदी घातली होती. शुक्रवारी पेटीएमने जाहीर केले की ते पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएमचे ऑपरेशन वेगळे करणार आहे.

राहुल शेळके

Paytm Payment Bank: एक महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमच्या पेमेंट बँकेला 15 मार्च नंतर काम करण्यास बंदी घातली होती. शुक्रवारी पेटीएमने जाहीर केले की ते पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएमचे ऑपरेशन वेगळे करणार आहे. पेटीएम यापुढे आपल्या ग्राहकांना त्या ऑफर देणार नाही ज्या ते पेटीएम पेमेंट बँकेद्वारे देत होते. (Impact of RBI Scrutiny, Paytm Decided to Separate from Paytm Payment Bank)

पेटीएमच्या बोर्डाने सहयोगी संस्था, पेटीएम पेमेंट बँकेसह अनेक करार रद्द करण्यास मान्यता दिली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने 1 मार्च रोजी स्टॉक एक्सचेंजला याची माहिती दिली. यापूर्वी, पेटीएमने घोषणा केली होती की ती इतर बँकांसोबत नवीन भागीदारी करेल आणि ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सेवा देण्यासाठी काम करेल.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयची बंदी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईमुळे हे पाऊल उचलले आहे. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला 15 मार्च 2024 नंतर ग्राहकांच्या खात्यांमध्ये आणि वॉलेटमध्ये पैसे स्वीकारण्यास मनाई केली आहे.

बँकेला खात्यातून पैसे काढण्याशिवाय सर्व बँकिंग सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला हे करण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. नंतर त्यात वाढ करण्यात आली.

पेटीएमच्या शेअर्समध्ये वाढ

1 मार्च रोजी पेटीएमचे शेअर्स वाढत आहेत. सकाळी BSE वर शेअर 413.55 रुपयांच्या वाढीसह उघडला. सकाळी 9.30 च्या सुमारास शेअर 3 टक्क्यांच्या वाढीसह 417.65 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या एका महिन्यात स्टॉक 33 टक्क्यांनी घसरला आहे.

कंपनीचे मार्केट कॅप 26,526 कोटी रुपये आहे. अलीकडेच, पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अर्धवेळ नॉन-एक्झिक्युटिव्ह अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT