Income certificate to given after five years Sanjay Gandhi Shravanbal Yojana condition relaxed  sakal
Personal Finance

Income Certificate : उत्पन्नाचा दाखला पाच वर्षांनी द्यावा लागणार; संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी अट शिथिल

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असे, यापुढे मात्र राज्य सरकारने लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यास अडचणी येत असल्याने दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता ५ वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास अनुमती दिली आहे . तशा प्रकारचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.

जवळपास ४१ लाखजण या योजनेचे लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. याशिवाय, श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील ६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्रियांना व पुरुषांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : ''परधर्मातील मुलासोबत पळून जाणाऱ्या मुलींचे हातपाय तोडा'', भाजपच्या माजी खासदाराचं वादग्रस्त विधान!

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

Crime: लग्नाच्या ११ दिवसांनी १६ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला, नंतर १९ व्या दिवशी पतीला अटक अन्...; घटना वाचून डोकं चक्रावेल

Nashik News : दत्त मंदिराची त्वरित पुनर्स्थापना करा; हिंदू एकता आंदोलन आणि काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा

Latest Marathi News Live Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

SCROLL FOR NEXT