income tax department may send notice if tds deducted but not filed itr marathi news  
Personal Finance

Income Tax Notice : TDS कापला गेला पण ITR भरला नाही? येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लवकरच ज्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरला नाही अशा लोकांना नोटीस पाठवू शकते.

रोहित कणसे

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लवकरच ज्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरला नाही अशा लोकांना नोटीस पाठवू शकते. बिझनेस टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की ज्यांच्या इन्कममधून टिडीएस कापला गेला, मात्र तुम्ही आयटीआर भरला नसेल तर नोटीस पाठवली जाऊ शकते.

सेंट्रल डायरेक्ट टॅक्स बोर्ड (CBDT)चे चेअरमन नितीन गुप्ता यांनी सांगितले की, ज्यांच्याबद्दल ठोस माहिती आहे अशाच करदात्यांना नोटीस पाठवल्या जातील. त्यांनी सांगितल की, आयकर विभागाचे लक्ष रिफंडसाठीचा वेळ कमी करणे तसेच रिटर्न अपडेट करणे किंवा मोठे टॅक्ससंबंधी वाद सोडवणे यावर असेल. सोबतच आयकर विभागाकडून करदात्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर देखील भर दिला जाईल.

CBDTचे चेअरमन म्हणाले की CBDTने म्हैसूरमध्ये एक डिमांड मॅनेजमेंट सेंटर स्थापन केले आहे, जे एक कोटी रुपयांहून अधिकच्या टॅक्स संबंधी वादांवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यांनी सांगितलं की टॅक्सपेअर्स त्यांच्या माध्यमातून या टॅक्ससंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी सीए आणि अधिकाऱ्यांशी संपर्क करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT