increase business loan Low personal loan disbursement CareEDge Ratings report Sakal
Personal Finance

बँकांकडून उद्योगांच्या कर्जात वाढ; वैयक्तिक कर्जवितरणाचे प्रमाण कमी, ‘केअरएज रेटिंग्ज’चा अहवाल

देशातील बँकिंग क्षेत्राने मार्च महिन्यात कर्जवितरणात चांगली वाढ नोंदविली असून, उद्योगांना कर्जपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील बँकिंग क्षेत्राने मार्च महिन्यात कर्जवितरणात चांगली वाढ नोंदविली असून, उद्योगांना कर्जपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक कर्जवितरणाचे प्रमाण मात्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ‘केअरएज रेटिंग्ज’ने बँकिंग क्षेत्रातील कर्ज वितरणाबाबत नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये बँकांचे एकूण कर्ज वितरण २०.२ टक्क्यांनी वाढले आहे. या वाढीसाठी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे विलीनीकरण कारणीभूत ठरले आहे. एचडीएफसीचे विलीनीकरण गृहित न धरता कर्ज वितरणातील वाढ १६.३ टक्के आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ती १५ टक्के होती.

वैयक्तिक कर्जांमध्ये गृहकर्जाचे वितरण मार्चमध्ये ३६.९ टक्के वाढले आहे, तर वाहनकर्जाच्या वितरणातील वाढ कमी होऊन १७.३ टक्क्यांवर आली आहे. व्यावसायिक कर्जांमध्ये मार्च महिन्यात १६.३ टक्के वाढ झाली असून, त्यात उद्योग आणि सेवांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही वाढ १२.५ टक्के होती.

एचडीएफसीचे विलीनीकरण गृहित न धरताही यंदा मार्चमधील वाढ १४.६ टक्के असून, ती गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये सेवाक्षेत्रासाठीच्या कर्ज वितरणात २२.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. त्या खालोखाल व्यापार, बांधकाम आणि वित्तीय संस्थांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT