Raghuram Rajan Sakal
Personal Finance

Raghuram Rajan: रघुराम राजन यांनी मोदी सरकारचे केले कौतुक; म्हणाले, गेल्या 10 वर्षात...

Raghuram Rajan Update: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. राजन म्हणाले, गेल्या 10 वर्षांत भारताने पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.

राहुल शेळके

Raghuram Rajan Update: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. राजन म्हणाले, गेल्या 10 वर्षांत भारताने पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. परंतु देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

राजन यांनी मेक इन इंडियाचे केले कौतुक

रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर सरकारचे लक्ष हे योग्य पाऊल आहे, परंतु हे काम योग्यरित्या पार पाडणे देखील महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना रघुराम राजन म्हणाले, मी म्हणेन की हेतू चांगला आहे. पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात आपण बरेच काही केले आहे असे मला वाटते.

सरकारने टीका ऐकून घेतली पाहिजे

राजन म्हणाले की, सरकारने आपल्या टीकाकारांकडून इतर क्षेत्रातील आवश्यक पावलांची माहिती गोळा करून त्यानुसार काम केले पाहिजे. आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणाले, जर आपण त्यावर लक्ष केंद्रित केले तर मला वाटते की मेक इन इंडियाच्या संकल्पनेला बळ मिळेल. सरकारने आपल्या धोरणावर काही स्वार्थ किंवा छुपा अजेंडा असल्याचे सांगून टीका फेटाळून लावू नये.

शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे

भारताला या दशकातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी 7 टक्के विकास दर पुरेसा असेल का, असे विचारले असता राजन म्हणाले की, सात टक्क्यांच्या दराने विकास झाला तर आपण जर्मनीला मागे टाकू. आणि तीन वर्षांत जपानला.

ही काही अशक्य गोष्ट नाही. ते म्हणाले, सर्वात चिंतेची बाब म्हणजे जेव्हा आपण विकसित राष्ट्र म्हणतो, तेव्हा विकसित होणे म्हणजे काय हे आपण तपासले पाहिजे? मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाच्या सुधारणांबाबत विचारले असता ते म्हणाले की, सर्वाधिक गरज शिक्षणावर भर देण्याची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT