India increases import duty on gold and silver findings, coins of precious metals to 15 percent  Sakal
Personal Finance

Gold Import Duty: सोन्या-चांदीवर सरकारने वाढवले आयात शुल्क, किंमतीवर काय परिणाम होणार?

Gold Import Duty: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने सोने आणि चांदी तसेच मौल्यवान धातूंच्या आयात शुल्क वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयाने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 12.50 टक्क्यांवरून 15 टक्के केले आहे.

राहुल शेळके

Gold Import Duty: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने सोने आणि चांदी तसेच मौल्यवान धातूंवर आयात शुल्क वाढवले ​​आहे. अर्थ मंत्रालयाने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 12.50 टक्क्यांवरून 15 टक्के केले आहे. याशिवाय मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या नाण्यांवरील कस्टम ड्युटीही वाढवण्यात आली आहे.

आयात शुल्कामुळे भारतात सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किंमतींपेक्षा जास्त आहेत. अशा स्थितीत आयात शुल्क वाढल्याने किंमतींवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. आयात शुल्कात वाढ करण्याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

सोन्या-चांदीशी संबंधित लहान घटक जसे की हुक, क्लॅस्प, पिन, कॅच आणि स्क्रूवर आयात शुल्क वाढले आहे. हे लहान घटक सामान्यत: दागिन्यांचा तुकडा किंवा भाग ठेवण्यासाठी वापरले जातात.

नवीन आयात शुल्क कधी लागू होईल?

आयात शुल्काचे नवे दर 22 जानेवारीपासून म्हणजेच काल सोमवारपासून लागू झाले आहेत. देशाच्या अर्थसंकल्पाला आता 8 दिवस शिल्लक आहेत आणि ते 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्याऐवजी 22 जानेवारीपासूनच त्याची अंमलबजावणी केली आहे.

या बदलाचा उद्देश आयात नियंत्रित करणे आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार देणे हा आहे. त्याच वेळी, GJEPC (Gem and Jewellery Export Promotion Council) सोन्या-चांदीवरील आयात शुल्क सध्याच्या 15 टक्क्यांवरून 4 टक्के करण्याची मागणी करत आहे.

अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये, कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील सीमाशुल्क सध्याच्या 5 टक्क्यांवरून 2.5 टक्के कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT