RBI Repo Rate
RBI Repo Rate Sakal
Personal Finance

RBI Repo Rate : HDFC चे चेअरमन दीपक पारेख यांची RBI च्या रेपो रेटच्या निर्णयावर मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...

राहुल शेळके

RBI Repo Rate : एचडीएफसी लिमिटेड (हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन) चे अध्यक्ष दीपक पारेख यांनी शनिवारी सांगितले की, "आम्ही भाग्यवान आहोत की शेवटी रिझर्व्ह बँकेने व्याजदराचे चक्र थांबवले आहे."

चलनविषयक धोरण समितीच्या गुरुवारी झालेल्या दोन दिवसीय बैठकीनंतर केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, दीपक पारेख यांनी यावर भाष्य केले.

आरबीआयच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला :

आरबीआयच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सलग 11 महिन्यांच्या वाढीमुळे रेपो दरात आतापर्यंत 250 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे.

यावेळी देखील अशी शक्यता होती की RBI MPC पुन्हा 25 बेसिस पॉइंटने दर वाढवू शकेल. पण तो 6.5% ठेवण्याचा निर्णय घेऊन समितीने सर्वांना चकित केले.

दर पुन्हा वाढू शकतात :

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिला की, व्याजदरात घेतलेल्या विरामाचा अर्थ असा नाही की येथून पुढे दर स्थिर राहतील किंवा कपात सुरू होईल. गरज भासल्यास आरबीआय पुन्हा दर वाढवण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे ते म्हणाले.

दीपक पारेख यांनी भारताच्या आर्थिक स्थिरतेवर विश्वास व्यक्त केला

एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे एका व्यवस्थापन कार्यक्रमात बोलताना, एचडीएफसीच्या अध्यक्षांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेच्या संदर्भात, भारतात व्याजदर स्थिर ठेवल्याचा निर्णय घेतल्याचे कौतुक केले.

ते म्हणाले की, जागतिक धक्क्यांपासून भारतही वाचलेला नाही. परंतु काही मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा भारत वेगळा आहे.

ते म्हणाले की भारतामध्ये सामर्थ्य, राजकीय स्थैर्य, लस सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि मजबूत उपभोगावर आधारित अर्थव्यवस्था असे अनेक पैलू आहेत. याव्यतिरिक्त, डिजिटल उपक्रमांमध्ये लक्षणीय प्रगती पाहिली आहे.

आपल्या भाषणाच्या शेवटी, ते म्हणाले की, सध्या भारतात तरुण असणे खूप उत्साहजनक आहे कारण आपण सतत उद्योजकतेच्या संधी पाहत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT