India's economy is projected to become an upper middle-income country
India's economy is projected to become an upper middle-income country Sakal
Personal Finance

Indian Economy: 7 वर्षानंतर प्रत्येक भारतीय सरासरी इतके पैसे कमवणार; 7 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होणार

राहुल शेळके

India Ratings: आर्थिक वर्ष 2033 ते 36 दरम्यान, भारत 4,466 ते 13,845 डॉलर या दरडोई उत्पन्नासह उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न श्रेणीत पोहोचू शकतो. तसेच, 2043 ते 47 या आर्थिक वर्षात भारत 15 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनू शकतो. इंडिया रेटिंग अँड रिसर्चने सोमवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. (India may transform into an upper middle income economy by FY33-36 says India Ratings and Research)

रेटिंग एजन्सीच्या अहवालात असा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष 2024 ते आर्थिक वर्ष 2047 पर्यंत भारताला 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी वार्षिक 9.7 टक्के वाढीची आवश्यकता आहे.

इंडिया रेटिंगच्या अहवालात असे म्हटले आहे की 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठण्याचे लक्ष्य सोपे नाही. अलीकडील अहवालात, रेटिंग एजन्सी क्रिसिलने असेही म्हटले आहे की भारत उच्च मध्यम उत्पन्नाचा देश बनेल आणि अर्थव्यवस्थेचा आकार जवळजवळ दुप्पट होईल. (India's economy is projected to become an upper middle-income country)

CRISIL ने म्हटले आहे की खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारचा सतत खर्च, कार्यक्षमता आणि डिजिटलायझेशनमुळे देशातील विकासाला गती मिळत आहे.

सुनील कुमार सिन्हा, वरिष्ठ संचालक, इंडिया रेटिंग्ज यांच्या मते, 30 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडण्यासाठी, भारताच्या अर्थव्यवस्थेला 2047 पर्यंत 9.7 टक्के दराने वाढ करावी लागेल.

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.7 टक्क्यांहून जास्त होता असे गेल्या 50 वर्षांत दोनदाच घडले आहे. हा आकडा 1973 ते 1982 आणि 2003 ते 2012 या वर्षांमध्ये 9.7 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. पण, हा दर जास्त काळ टिकवून ठेवणे हे फार कठीण काम आहे.

मध्यम उत्पन्न गटाचे वाढते उत्पन्न आणि चांगल्या जीवनशैलीमुळे वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होत आहे आणि त्यामुळे ते आर्थिक वाढीचे इंजिन म्हणून काम करत आहे.

अलीकडेच रेटिंग एजन्सी क्रिसिलने देखील आपल्या अंदाजात म्हटले आहे की भारत 2031 पर्यंत उच्च मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था बनेल. तसेच तो 7 ट्रिलियन डॉलरचा आकडा पार करेल. सुनील कुमार सिन्हा म्हणाले की, जागतिक पाठिंब्याशिवाय कोणताही देश सात टक्क्यांपेक्षा जास्त विकास दर गाठू शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT