किरकोळ महागाई दर ५.०९ टक्के Sakal
Personal Finance

Inflation Rate : फेब्रुवारीत महागाईच्या झळा सुसह्य; किरकोळ महागाई दर ५.०९ टक्के

उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली असताना, महागाई सुसह्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली असताना, महागाई सुसह्य झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर ५.०९ टक्के नोंदवला गेला अाहे. गेल्या चार महिन्यांतील हा कमी दर आहे.

जानेवारीच्या तुलनेत महागाईदर थोडा अधिक असला, तरीही गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत खूप कमी आहे. सलग सहा महिने महागाई रिझर्व्ह बँकेच्या दोन ते सहा टक्के या अपेक्षित मर्यादेच्या आत राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.

अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर ५.१ टक्के होता, तर फेब्रुवारी २०२३ मध्ये तो ६.४४ टक्के होता. अन्नधान्याच्या महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये ८.६६ टक्के होता. जानेवारीमधील ८.३ टक्क्यांवरून त्यात किरकोळ वाढ झाली आहे.

ग्रामीण भागातील महागाईदर फेब्रुवारीमध्ये ५.३४ टक्के नोंदवला गेला. जानेवारीमध्ये हा दर तितकाच होता. डिसेंबरमध्ये महागाईदर ५.९३ टक्के होता. शहरी भागातील महागाईदर जानेवारीमधील ४.९२ टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ४.७८ टक्के नोंदवला गेला.

गेल्या महिन्यात, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईदर ५.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता आणि जानेवारी-मार्च तिमाहीत ती पाच टक्के नोंदवली गेली होती.

महागाई दर

  • ग्रामीण - ५.३४ टक्के

  • शहरी- ४.७८ टक्के

  • अन्नधान्य -८.६६ टक्के

औद्योगिक वाढ

देशाच्या औद्योगिक उत्पादनात जानेवारीमध्ये ३.८ टक्के वाढ झाली आहे. सरकारने आजही आकडेवारी जाहीर केली. जानेवारी २०२२३ मध्ये हे प्रमाण ५.८ टक्के होते. औद्योगिक उत्पादन निर्देशांक जानेवारीमध्ये ३.८ टक्क्यांनी वाढला. उत्पादन क्षेत्राने ३.२ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून, मागील वर्षीच्या याच महिन्यातील ४.५ टक्क्यांपेक्षा या महिन्याच वाढ मंदावली आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये, खाण उत्पादनात ५.९ टक्क्यांनी, वीज उत्पादनात ५.६ टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये ५.९ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत ती ५.५ टक्के होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT