Indian Economy sakal
Personal Finance

Indian Economy: अमेरिकेला मागे टाकत भारत होणार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, कोण असेल टॉपवर?

भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन झपाट्याने बदलला आहे.

राहुल शेळके

Indian Economy News: सध्या जगात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सर्वात जास्त बलाढ्य कोणता देश असेल तर तो म्हणजे भारत. जगातील इतर देशांपैकी भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढत आहे. आता जगातील आघाडीची गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे की, 2075 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकेल. अशा प्रकारे ती जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आणि चीन पहिल्या क्रमांकावर असेल. लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. 1.4 अब्ज लोकसंख्येसह भारत हा जगातील सर्वाधिक मोठा लोकसंख्या असलेला देश बनला आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन झपाट्याने बदलला आहे. याचे कारण म्हणजे आपली झपाट्याने वाढणारी मध्यमवर्गीय लोकसंख्या आणि त्यासोबत वाढती मागणी आणि वापर.

आज भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के लोक मध्यमवर्गीय आहेत. 2031 पर्यंत ते 38 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, 2047 पर्यंत, भारतीय लोकसंख्येतील मध्यमवर्गीय लोकसंख्या 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशातील मध्यमवर्गीय लोकांची संख्या 1 अब्जाहून अधिक असेल.

चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल

Goldman Sachs ने आलेखाद्वारे चीन, भारत, अमेरिका युरोप आणि जपानच्या GDP वाढीचा अंदाज दर्शविला आहे. हा आलेख दाखवतो की 1980 ते 2010 पर्यंत भारताचा जीडीपी इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी होता.

त्याच वेळी, 2020 ते 2075 दरम्यान, भारताचा जीडीपी सतत आणि मोठ्या वेगाने वाढणे अपेक्षित आहे. Goldman Sachs च्या अंदाजानुसार, 2075 पर्यंत भारताचा GDP 52.5 ट्रिलियन डॉलर असेल.

गोल्डमन सॅक्स रिपोर्ट

अशा प्रकारे ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. 57 ट्रिलियन डॉलर्ससह चीन पहिल्या क्रमांकावर असेल.

त्याच वेळी, अमेरिका 51.5 ट्रिलियन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर असेल, युरोप 30.3 ट्रिलियन डॉलर्ससह चौथ्या स्थानावर असेल आणि जपान 7.5 ट्रिलियन डॉलर्ससह पाचव्या स्थानावर असेल.

आता काय स्थिती आहे?

सध्या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ही 23.3 ट्रिलियन डॉलरच्या GDPसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

17.7 ट्रिलियन डॉलरसह चीन जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे, ज्याचा जीडीपी 4.9 ट्रिलियन डॉलर आहे.

जर्मनी 4.3 ट्रिलियन डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारत 3.2 ट्रिलियन डॉलरच्या GDPसह पाचव्या क्रमांकावर आहे. यूके सहाव्या स्थानावर आहे, ज्याची अर्थव्यवस्था 3.1 ट्रिलियन डॉलर आहे.

भारताची जीडीपी वाढ जगात सर्वाधिक

1.4 अब्ज लोकसंख्या असलेला भारत जीडीपीमध्ये पुढे जाऊ शकतो, असे गोल्डमन सॅक्सचे म्हणणे आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतातील प्रतिभा, कर्मचारी आणि सर्वाधिक काम करणा-या वयोगटातील लोकसंख्या यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यास मदत होईल. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताची GDP वाढ 7.2% होती, जी या कालावधीत जगातील सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT