Indian tax authorities investigating Apple, Google, Amazon over Rs 5,000 crore alleged tax non-payment  Sakal
Personal Finance

Income Tax: गुगल, अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉन कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर; काय आहे 5,000 कोटींचे प्रकरण?

Income Tax: आयकर विभागाने गेल्या काही महिन्यांमध्ये 10 हून अधिक कंपन्यांवर छापे टाकले होते.

राहुल शेळके

Income Tax: गुगल, अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉन या कंपन्यांनी कर न भरल्याबद्दल आयकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. हे प्रकरण 2021 मध्ये सुरू झालेल्या तपासणीच्या संदर्भात आहे. कर अधिकाऱ्यांनी कंपन्यांनी केलेल्या व्यवहारांचे तपशीलवार स्पष्टीकरण मागितले आहे. आय-टी विभाग 5,000 कोटींहून अधिक कराची मागणी करु शकते.

अॅपल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा या प्रकरणात समावेश आहे. असे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

सध्याच्या चौकशीत, कर विभाग तीन प्रमुख टेक कंपन्या-Apple, Amazon आणि Google च्या जाहिरात खर्च, रॉयल्टी, ट्रेडिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेगमेंट्स आणि मार्केटिंग संबंधित सेवांच्या व्यवहारांची तपासणी करत आहे.

आय-टी विभाग आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या व्यवहारांच्या नियमांचे कंपन्या पालन करतात की नाही याची वारंवार तपासणी करत असते. ज्या कंपन्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर आय-टी विभागाकडून कारवाई केली जाते.

आयकर विभागाने गेल्या काही महिन्यांमध्ये 10 हून अधिक कंपन्यांवर छापे टाकले आहेत. या कंपन्यांनी आयकर विभागाची दिशाभूल करण्यासाठी कागदपत्रांचे दोन वेगवेगळे संच तयार केल्याचा आरोप प्राप्तिकर विभागाने केला होता.

कंपन्यांवर कर चुकविल्याचा आणि चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला होता. कर वाचवण्यासाठी कंपन्या अनेक चुकीच्या पद्धतींचा अवलंब करत असल्याचा आरोप आहे.

या वर्षी जुलै महिन्यात आयकर विभागाने हायर कंपनीवरही छापे टाकले होते. कंपनीच्या मुंबई, पुणे आणि नोएडा येथील कंपन्यांवर हे छापे टाकण्यात आले होते. आयकर विभागाने तेथील सर्व कार्यालयांचीही झडती घेतली होती. कंपनीवर चुकीच्या पद्धतीने उत्पन्न आणि रॉयल्टी पेमेंटचा अहवाल दिल्याचा आरोप होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT