Retirement Savings eSakal
Personal Finance

Retirement Savings : निवृत्तीसाठी बचत करणाऱ्यांची संख्या झाली कमी, महिलांची आकडेवारी चिंताजनक; अहवालात बाब उघड

Retirement Fund : या वर्षी निवृत्तीनिधी जमा करण्यासाठी काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या ६८ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

India Retirement Planning : देशातील घरगुती बचतीत मोठी घसरण झाल्याचा फटका निवृत्तीसाठीच्या आर्थिक नियोजनाला बसला आहे. गेल्या वर्षीच्या ४५ टक्के सेवानिवृत्तीच्या आर्थिक नियोजनाच्या तुलनेत यंदा हे प्रमाण ३८ टक्क्यांवर आले आहे, असे निरीक्षण ‘बँकबझार’ संस्थेने केलेल्या वार्षिक सर्वेक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

या अहवालानुसार, या वर्षी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ४८.४५ टक्के होते, ते या वर्षी ३४.३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, तर पुरुषांचे प्रमाण तुलनेत स्थिर असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी निवृत्तीनियोजन करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण ४१.८६ टक्के होते, ते यंदा ४०.१ टक्के झाले आहे. यंदा केवळ एक टक्का घट झाली आहे.

या वर्षी निवृत्तीनिधी जमा करण्यासाठी काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या ६८ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. तुलनेत पुरुषांचे प्रमाण मात्र, ५४ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. निवृत्तीनिधीसाठी काहीही आर्थिक नियोजन नसणाऱ्या महिलांचे प्रमाण २०२२ मधील ३२ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ही चिंताजनक बाब आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी नियोजनाची सुरुवात करणाऱ्या २० ते ३० वर्षे वयोगटातील लोकांचे प्रमाणही यंदा कमी झाले आहे. या वयोगटातील साधारण नऊ टक्के लोकांनी निवृत्तीसाठी ५० ते ७५ लाख रुपयांचा निधी उभारण्याची योजना असल्याचे, तर आठ टक्के लोकांनी ७५ लाख ते एक कोटी रुपये निधी जमा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी १८ टक्के लोकांनी ५० ते ७५ लाख रुपये निधी उभारण्याचे , तर १७ टक्के लोकांनी ७५ लाख ते एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले होते. महिलांमध्ये, २८-३४ वर्षे वयोगटातील २२ टक्के महिलांनी ५०-७५ लाख रुपये निवृत्तीनिधी उभारायचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले, तर २२ ते २७ वर्षे वयोगटातील सात टक्के महिला आणि २८ ते ३४ वर्षे वयोगटातील १३ टक्के महिलांना १.५ ते दोन कोटी रुपये उभे करायचे आहेत.

तुलनात्मक आकडेवारी

  • निवृत्तीनिधीसाठी नियोजन करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण वार्षिक एक टक्का कमी.

  • बचत करणाऱ्या महिलांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या ४८.४५ टक्क्यांवरून यंदा ३४.३ टक्क्यांपर्यंत घट.

  • काहीही नियोजन नसणाऱ्या महिलांच्या प्रमाणात २०२२ मधील ३२ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढ.

  • निधीसाठी बचत खात्यांना ६७ टक्के, मुदत ठेवी, म्युच्युअल फंडांना ५७ टक्के लोकांची पसंती.

  • ५० ते ७५ लाखांच्या निधीचे उद्दिष्ट असणाऱ्यांचे प्रमाण १८ वरून नऊ टक्क्यांवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT