India's cashless payments in a month equal to America's in 3 years says Jaishankar Sakal
Personal Finance

UPI Payment: कॅशलेस पेमेंटमध्ये भारताने अमेरिकेला टाकले मागे; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा दावा

UPI Payment: नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतीयांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज भारताला आपल्या परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत एका महिन्यात जितके कॅशलेस व्यवहार करतो तितकेच व्यवहार अमेरिका तीन वर्षात करते.

राहुल शेळके

UPI Payment: नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतीयांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज भारताला आपल्या परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत एका महिन्यात जितके कॅशलेस व्यवहार करतो तितकेच व्यवहार अमेरिका तीन वर्षात करते.

ते म्हणाले की, प्रत्येक भारतीय नागरिकाचे जीवन सुकर झाले आहे आणि याचे कारण आम्ही तंत्रज्ञानाचा अतिशय खोलवर स्वीकार केला आहे. तुम्ही हे डिजिटल पेमेंटमध्ये पाहू शकता, आज खूप कमी लोक रोखीने व्यवहार करत आहेत आणि खूप कमी लोक रोख स्वीकारतात.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी नायजेरियासोबतच्या संबंधांवर भाष्य केले

नायजेरियाशी असलेल्या संबंधांबद्दल जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांमधील व्यापार सुमारे 12-15 अब्ज डॉलर्सचा आहे. ते म्हणाले की, जगात अशा फार कमी सभ्यता आहेत ज्या आधुनिक राष्ट्र म्हणून टिकून आहेत आणि आपण त्यापैकी एक आहोत. त्यांनी नायजेरियन गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचे निमंत्रणही दिले आहे.

परराष्ट्र मंत्र्यांनी भारताने कोविड महामारीचा सामना ज्या प्रकारे केला त्याचे कौतुक केले. ते म्हणाले की अनेक देश अजूनही त्याच्या प्रभावाचा सामना करण्यास सक्षम नाहीत, परंतु भारत सरकारने परदेशातून आपल्या 7 दशलक्ष लोकांना परत आणले आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करून नोटाबंदीची घोषणा केली. त्यानंतर सरकारने देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देत डिजिटल पेमेंटवर भर देण्यास सुरुवात केली.

डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात कॅशबॅक सारख्या ऑफरही आणल्या. कोविडमुळे मार्च 2020 मध्ये देशात लॉकडाऊन करण्यात आले आणि लोकांना घरातच राहावे लागले. त्या काळात डिजिटल व्यवहारांना सर्वाधिक चालना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT