India's February WPI inflation at 0-20 percent versus 0-27 percent in January, 4-month low  Sakal
Personal Finance

WPI Inflation: घाऊक महागाई दर 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; काय आहे कारण?

WPI Inflation: जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये महागाई कमी झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई फेब्रुवारीमध्ये 0.20% पर्यंत खाली आली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई 0.27% वरून 0.20% वर आली आहे.

राहुल शेळके

WPI Inflation: जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये महागाई कमी झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई फेब्रुवारीमध्ये 0.20% पर्यंत खाली आली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई 0.27% वरून 0.20% वर आली आहे.

महागाई कमी झाली पण...

प्राथमिक वस्तूंची महागाई 3.84% वरून 4.49% पर्यंत वाढली आहे. अन्नधान्य महागाई 3.79% वरून 4.09% पर्यंत वाढली आहे. इंधन आणि उर्जा घाऊक महागाई -0.51% वरून -1.59% पर्यंत कमी झाला आहे. बटाट्याची घाऊक महागाई -8.40% वरून 15.34% पर्यंत वाढली आहे.

घाऊक महागाई म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक (WPI) म्हणजे घाऊक बाजारात एक व्यापारी दुसऱ्या व्यावसायिकाकडून आकारलेल्या किंमती यात मोजल्या जातात.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी एक निवेदन जारी केले की, 'ऑल इंडिया होलसेल प्राइस इंडेक्स (WPI) आकड्यांवर आधारित महागाईचा वार्षिक दर फेब्रुवारी, 2024मध्ये 0.20 टक्के आहे, जो फेब्रुवारीपेक्षा जास्त आहे.

आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई जानेवारीत 6.85 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये किरकोळ वाढून 6.95 टक्के झाली आहे. भाज्यांच्या महागाईचा दर जानेवारीत 19.71 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये 19.78 टक्क्यांवर पोहोचला. डाळींच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 18.48 टक्के होता, तो जानेवारीत 16.06 टक्के होता.

कच्च्या तेलाच्या घाऊक किंमतीत वाढ

कच्च्या तेलाच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 8.24 टक्क्यांनी वाढला आहे. इंधन आणि वीज महागाईचा दर जानेवारीत -0.51 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये -1.59 टक्के राहिली.

या आठवड्याच्या सुरुवातीला, भारताचा किरकोळ महागाईचा डेटा जाहीर करण्यात आला होता. ज्यामध्ये किरकोळ महागाई दर जानेवारीत 5.10 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारावर 5.09 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय?

घाऊक किंमत निर्देशांक हा (WPI) मोठ्या प्रमाणात विकल्या गेलेल्या आणि व्यापार केलेल्या वस्तूंच्या किंमतीतील बदलांचे मूल्यांकन करतो. अर्थव्यवस्थांमध्ये महागाई दर मोजण्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय)चा वापर केला जातो. घाऊक किंमत निर्देशांकामध्ये फक्त वस्तूंचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये सेवांचा समावेश नसतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT