IT sector  sakal
Personal Finance

आयटी बीज(निप्पॉन इंडिया ईटीएफ निफ्टी आयटी)(शुक्रवारचा बंद भाव : रु. ४३.७५)

जागतिक स्तरावर डिजिटलायझेशनच्या वाढत्या गरजेने भारतातील आयटी क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. बँकिंग, वित्तीय सेवा, हेल्थकेअर, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये आयटी सेवांची मागणी वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

स्मार्ट गुंतवणूक

भूषण गोडबोले,‘सेबी’ नोंदणीकृत संशोधक-विश्लेषक

जागतिक स्तरावर डिजिटलायझेशनच्या वाढत्या गरजेने भारतातील आयटी क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. बँकिंग, वित्तीय सेवा, हेल्थकेअर, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये आयटी सेवांची मागणी वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स; तसेच मशीन लर्निंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या विकासामुळेदेखील आयटी कंपन्यांच्या सेवा मागणीत वाढ होत आहे. या तंत्रज्ञानांचा वापर करून व्यवसायांची कार्यक्षमता वाढवणे आणि नवी सेवा प्रदान करणे शक्य झाले आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या वापरामुळे आयटी कंपन्या व्यवसायवृद्धी करत आहेत. कंपन्या आणि संस्था त्यांचा डेटा आणि सेवांचे व्यवस्थापन क्लाऊडवर करण्यास प्राधान्य देत आहेत, यामुळे आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर प्रकल्प मिळत आहेत.

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया; तसेच स्टार्ट-अप इंडिया यांसारख्या मोहिमांनी आयटी क्षेत्राला विशेष प्रोत्साहन मिळाले आहे. भारतीय आयटी कंपन्यांनी आपली सेवा जागतिक स्तरावर विस्तारली आहे. अमेरिका, युरोपसह इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येदेखील भारतीय आयटी सेवांची मोठी मागणी आहे. भारतीय कंपन्या संशोधनावर भर देत नव्या तंत्रज्ञानांचा वापर करून आपली सेवा व उत्पादने सुधारत आहेत, ज्यामुळे त्यांची स्पर्धात्मकता वाढत आहे. आयटी क्षेत्र हे देशातील एक प्रमुख रोजगारनिर्मितीचे क्षेत्र बनले असून, एकूण देशांतर्गत उत्पादनात त्याचे मोठे योगदान आहे.

‘निफ्टी आयटी’ निर्देशांक

‘निफ्टी आयटी’ निर्देशांक भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअरच्या कामगिरीचा वेध घेतो. ‘निफ्टी आयटी’ निर्देशांकात १० प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, ‘निफ्टी आयटी’ निर्देशांकाने जानेवारी २०२२ पासून मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात ४०,९७७ अंशांवर बंद भाव देत आलेखानुसार तेजीचा कल दर्शविला आहे.

गुंतवणूकदारांसाठी ‘निप्पॉन इंडिया आयटी बीज’ एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. हा एक एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आहे, जो विशेषतः आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक यासारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. यामुळे गुंतवणूकदारांना एकाच फंडाद्वारे विविध आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा लाभ मिळू शकतो.

‘आयटी बीज’मध्ये शेअर बाजारात शेअरसारखी खरेदी-विक्री करता येते. आयटी क्षेत्रातील विविध दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी ‘आयटी बीज’चा जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT