Nirmala Sitharaman Sakal
Personal Finance

Retail Inflation Data: सर्वसामान्यांना मोठा झटका! जून महिन्यात महागाई दरात मोठी वाढ, खाद्यपदार्थही महागले

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांचा महागाई दर 4.49 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राहुल शेळके

Retail Inflation Data: सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात किरकोळ महागाई दर 4.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी मे महिन्यात हा आकडा 4.25 टक्के होता.

मे महिन्यात महागाईचा दर गेल्या 25 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता. विशेष म्हणजे याआधी सलग चार महिने महागाईचा दर खाली येत होता. आता चार महिन्यांनंतर महागाईने पुन्हा यू-टर्न घेतला आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांचा महागाई दर 4.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी मे महिन्यात हा आकडा 2.96 टक्के होता. महागाई वाढण्यामागे भाज्यांचे वाढलेले भाव असल्याचे मानले जात आहे. विशेषत: टोमॅटो, लसूण या दैनंदिन वस्तूंच्या वाढीमुळे महागाई वाढली आहे.

किरकोळ महागाईला डाळीही जबाबदार

जून महिन्यात महागाई वाढण्यास डाळींचे चढे भावही कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. डाळींच्या महागाईचा दर मे महिन्यात 6.56 टक्के होता, तो जून महिन्यात 10.53 टक्के झाला.

तसेच जून महिन्यात पाले भाज्याही महागल्या आहेत. भाज्यांचा महागाई दर मे महिन्यात -8.18 टक्के होता तो जूनमध्ये वाढून -0.93 टक्के झाला. त्याच वेळी, दुग्धजन्य पदार्थांचे भाव मे महिन्यातील 8.91 टक्क्यांच्या तुलनेत 8.56 टक्क्यांवर स्थिर आहेत.

गेल्या महिन्यात साखरेचा भाव 2.51 टक्के होता

तृणधान्ये आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा महागाई दर 12.71 टक्के होता, जो मे महिन्यात 12.65 टक्के होता. तसेच जून महिन्यात साखरही महागली आहे. साखरेचा महागाई दर गेल्या महिन्यात 2.51 टक्के होता, तो आता जूनमध्ये 3 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महागाईविरोधातील लढाई सुरूच

जून महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर वाढला असला तरी तो रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या खाली आहे. जून महिन्यात किरकोळ महागाई दर 4.81 टक्के होता. मात्र यंदा पाऊस आणि पुरामुळे खरीप पिकासह पालेभाज्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

यासोबतच अनेक राज्यांमध्ये अल निनोचा धोकाही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अशा स्थितीत आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीच महागाईविरुद्ध लढाई सुरूच असल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

ना भडक लूक ना अतिशयोक्ती; कतरिना-विकीने साधेपणा नेटकऱ्यांना भावला, Viral Video

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

SCROLL FOR NEXT