Industrial Production News sakal
Personal Finance

Industrial Production News : औद्योगिक उत्पादनात मार्चमध्ये घसरण

देशाच्या औद्योगिक उत्पादनवाढीचा दर (आयआयपी) मार्चमध्ये ४.९ टक्क्यांवर घसरला आहे. फेब्रुवारीमध्ये हा दर ५.७ टक्के होता, असे सांख्यिकी मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाच्या औद्योगिक उत्पादनवाढीचा दर (आयआयपी) मार्चमध्ये ४.९ टक्क्यांवर घसरला आहे. फेब्रुवारीमध्ये हा दर ५.७ टक्के होता, असे सांख्यिकी मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

‘आयआयपी’ने यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये ११.९ टक्क्यांचा उच्चांक नोंदवला होता. नोव्हेंबरमध्ये तो २.५ टक्के, डिसेंबरमध्ये ४.२ टक्के आणि जानेवारी २०२४ मध्ये ४.१ टक्क्यांवर घसरला होता. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकत्रित वाढीचा दर ५.८ टक्के होता.

मार्च २०२४ मध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे उत्पादन फेब्रुवारीमधील पाच टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांनी वाढले. उत्पादन क्षेत्रामध्ये, मूलभूत धातूंचे उत्पादन ७.७ टक्के, औषधी व वनस्पति उत्पादन १६.७ टक्के आणि इतर वाहतूक उपकरणांचे उत्पादन २५.४ टक्के असल्याने या क्षेत्राने वाढ नोंदवली आहे, असेही सांख्यिकी विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, वीजनिर्मिती वार्षिक ८.६ टक्क्यांनी वाढली असून फेब्रुवारीमध्ये ती ७.५ टक्क्यांनी वाढली होती. खाण उत्पादनात १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्चमध्ये वापर आधारित वर्गीकरणानुसार मार्च २०२३च्या तुलनेत आयआयपी वाढीचा दर प्राथमिक वस्तूंमध्ये २.५ टक्के, भांडवली वस्तूंमध्ये ६.१ टक्के, पायाभूत सुविधा, बांधकाम वस्तूंमध्ये ६.९ टक्के, अधिकृत आकडेवारीनुसार ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये ९.५ टक्के आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT