Narayana Murthy Sakal
Personal Finance

Narayana Murthy: महाभारतातील कोणती व्यक्तिरेखा इन्फोसिसच्या नारायण मुर्तींची ठरली प्रेरणा?

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या यशाचे रहस्य काय आहे तुम्हाला माहीत आहे का?

राहुल शेळके

Narayana Murthy: इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या यशाचे रहस्य काय आहे तुम्हाला माहीत आहे का? नारायण मूर्ती यांनी फक्त 10,000 रुपये कर्ज घेऊन इन्फोसिसची स्थापना कशी केली आणि कसे ते कॉर्पोरेट क्षेत्रात अव्वल स्थानावर पोहचले?

बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे की ते भगवद्गीतेपासून खूप प्रेरित आहेत.

यादरम्यान त्यांनी महाभारतातील कोणते पात्र त्यांच्यासाठी सर्वात प्रेरणादायी आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात महाभारतातील पात्रांचे कसे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला हे देखील सांगितले. मूर्तींनी पुढे सांगितले की, आयुष्यात असे काही प्रसंग येतात जेव्हा श्रद्धा आणि देवाचे नामस्मरण करावे लागते.

महाभारतातील 'हे' पात्र नारायण मूर्तींना आवडते

या कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले की, महाभारतातील ज्या पात्राने मला सर्वात जास्त प्रेरणा दिली तो म्हणजे 'कर्ण' आणि त्याची उदारता. नारायण मूर्तींनी त्यांची संपत्ती त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि कंपनीच्या इतर सदस्यांसोबत वाटून घेण्यास उदारता दाखवली.

नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला तर्काच्या पलीकडे जाऊन विश्वासाचा अवलंब करावा लागतो आणि हीच वेळ असते जेव्हा तुमची देवावरील श्रद्धा फलदायी ठरते.

भगवद्गीता उद्धृत करून ते म्हणाले, 'भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे... तुम्ही जे काही कराल, जे काही केलेच पाहिजे ते सर्वोत्तम मार्गाने, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने करा आणि बाकीचे देवावर सोडा.'

पत्नी सुधा मूर्ती म्हणाल्या, 'यशस्वी पुरुष सामान्य नसतात...'

या कार्यक्रमात नारायण मूर्ती यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या यशाच्या प्रवासात साथ देणाऱ्या सुधा मूर्ती यांचाही सहभाग होता. पतीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, यशस्वी पुरुष 'सामान्य' नसतात.

सुधा मूर्ती पुढे म्हणाल्या की, 'मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की अधिक यशस्वी माणसाला सामोरे जाणे खूप कठीण असते. यशस्वी पुरुष त्यांच्या खास लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT