TIME World's Best Companies 2023 Sakal
Personal Finance

जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांची यादी जाहीर, भारतातील फक्त एकाच कंपनीला मिळाले टॉप 100 मध्ये स्थान

TIME World's Best Companies 2023: 'टाइम'ने जगातील सर्वोत्तम 100 कंपन्यांची यादी जाहीर केली आहे.

राहुल शेळके

TIME World's Best Companies 2023: जगातील प्रसिद्ध मासिक 'टाइम'ने 2023 मधील जगातील सर्वोत्तम 100 कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केवळ एका भारतीय कंपनीला टॉप-100 मध्ये स्थान मिळाले आहे.

या यादीत फक्त इन्फोसिस कंपनीचे नाव आहे. इन्फोसिस ही एकमेव भारतीय कंपनी आहे. एकूण 750 जागतिक कंपन्यांच्या यादीत इन्फोसिस 64 व्या स्थानावर आहे.

2020 च्या आकडेवारीनुसार, Infosys भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी बनली आहे. कंपनीचे जगभरात 3 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत.

कोणती कंपनी नंबर वन?

टाईम मॅगझिननुसार, जगातील पहिल्या चार कंपन्यांची नावे मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गुगलच्या मालकीची कंपनी अल्फाबेट आणि फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटा आहेत.

'या' भारतीय कंपन्याही टॉप 750 च्या यादीत

इन्फोसिस व्यतिरिक्त आणखी 7 भारतीय कंपन्यांना टॉप 750 कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे. या यादीत दिग्गज IT कंपनी विप्रोने 174 वे स्थान मिळवले आहे.

तर आनंद महिंद्राचा महिंद्रा समूह 210 व्या स्थानावर आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज 348 व्या स्थानावर आहे. या यादीत HCL Technologies ला 262 वे, HDFC बँकेला 418 वे स्थान, WNS ग्लोबल सर्विसेसला 596 वे आणि ITC ला 672 वे स्थान मिळाले आहे.

यादी कशाच्या आधारे बनवली?

टाईम मॅगझिनने कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रियांनुसार जगातील टॉप कंपन्यांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करण्यासाठी कंपन्यांचा तीन वर्षांचा डेटा वापरण्यात आला आहे.

यासोबतच या यादीत फक्त अशाच कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची कमाई किमान 100 दशलक्ष डॉलर्स आहे आणि ज्यांनी 2020 ते 2022 दरम्यान सकारात्मक वाढ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT