Instant PAN Card safe investment mutual fund share market finance Sakal
Personal Finance

इन्स्टंट पॅन कार्ड

बहुतांश आर्थिक व्यवहारांसाठी आता पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. पॅन कार्डामुळे प्राप्तिकर खात्याला आपल्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे शक्य झाले

सुधाकर कुलकर्णी

बहुतांश आर्थिक व्यवहारांसाठी आता पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. पॅन कार्डामुळे प्राप्तिकर खात्याला आपल्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे शक्य झाले आहे व यामुळे करचुकवेगिरीस आळा घालणे शक्य होऊ लागले आहे. बँक खाते, डी-मॅट खाते उघडणे, शेअर, म्युच्युअल फंड, एनपीएस, पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणे अशा सर्व बाबींसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. मात्र, प्रचलित फिजिकल पॅन कार्ड मिळण्यासाठी वेळ लागल्याने वरील बाबींसाठी विलंब होतो. ही अडचण इन्स्टंट पॅन कार्डमुळे दूर होते. हे ‘ई-पॅन कार्ड’ अगदी सहज व त्वरित मिळविता येते.

‘ई-पॅन कार्ड’ची प्रक्रिया

१) प्राप्तिकर खात्याच्या ई-फायलिंग वेबसाइटवर लॉग-इन करून इन्स्ंटट पॅन या पर्यायावर क्लिक करावे.

२) ‘गेट न्यू पॅन’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्या आधार कार्डचा तपशील द्यावा. त्यानंतर आधार कार्डशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ‘ओटीपी’ येईल. तो टाकल्यानंतर स्क्रीनवर आपल्या आधार कार्डचा सर्व तपशील दिसेल, तो एकदा तपासून खात्री करून घ्यावी.

३) पुढे गेल्यानंतर इन्स्टंट पॅन कार्डची मागणीचा अर्ज समोर येईल. तो पूर्ण व अचूकरित्या भरून सबमिट केला असता, प्राप्तिकर खात्याकडून आपल्या ई-मेल आयडीवर इन्स्टंट पॅन कार्ड ‘पीडीएफ’ स्वरुपात पाठविले जाते. ही सुविधा मोफत आहे.

४) ही सर्व प्रक्रिया कागदविरहित असून, यात आधार कार्ड जोडावे अथवा डाउनलोड करावे लागत नाही.

हे इन्स्टंट पॅन कार्ड आपण नेहमीच्या पॅन कार्डप्रमाणे वापरू शकतो. यामध्ये ‘क्यूआर कोड’ असून, तो स्कॅन केला असता कार्डधारकाचा सर्व तपशील (नाव, जन्म तारीख, पत्ता, फोटो मिळू शकतो.) असे ‘ई-पॅन कार्ड’ ‘एनएसडीएल’; तसेच ‘युटीआयटीएसएल’ या वेबसाइटवरसुद्धा मिळू शकते.

इन्स्टंट पॅन कार्ड मिळण्यासाठी अटी

१) अर्जदाराकडे स्वत:चे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व ते या आधी अन्य कोणत्याही पॅन कार्डशी लिंक असता कामा नये.

२) अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.

३) अर्जदार पॅन कार्डसाठी प्रथमच अर्ज करता असला पाहिजे.

थोडक्यात, इन्स्टंट पॅन कार्ड मिळविणे अगदी सोपे आहे व ते घेऊन आपले आर्थिक व्यवहार वेळेत करणे निश्चितच हितावह असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT