interest rates were as they were by Federal Reserve only one rate cut this year Sakal
Personal Finance

फेडरल रिझर्व्हतर्फे व्याजदर ‘जैसे थे’ यंदा एकदाच दरकपातीचे सूतोवाच

‘फेड’ने मार्चमध्ये तिमाही आर्थिक अंदाज जाहीर करताना जूनमध्ये व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली होती.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने जूनच्या पतधोरण बैठकीत व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’ ठेवले आहेत. फेडने बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. मुख्य व्याजदर आता ५.२५ ते ५.५० टक्केच राहणार आहेत. ‘फेड’च्या पतधोरण समितीने आता या वर्षात एकदाच व्याजदर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘फेड’ने मार्चमध्ये तिमाही आर्थिक अंदाज जाहीर करताना जूनमध्ये व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, यावेळीही व्याजदर कायम ठेवण्यात आल्याने अर्थतज्ञांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

अनेक महिन्यांच्या महागाईच्या तपशिलानंतर सावध भूमिका घेत व्याजदर आहे तेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ‘फेड’चे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. महागाई कमी होत असून, रोजगाराची बाजारपेठ लवचिक असल्याने व्याजदर स्थिर ठेवण्यासाठी संधी आहे,

ज्यामुळे अर्थव्यवस्थेला जास्त धोका न पोहोचवता महागाई रोखता येऊ शकतील, असे पॉवेल यांनी म्हटले आहे. सुदैवाने, अर्थव्यवस्था मजबूत असून, आम्ही आर्थिक जोखमीच्या नकारात्मक बाजूंवर लक्ष ठेवून आहोत, असेही पॉवेल यांनी नमूद केले.

आर्थिक वाढीचा दर चांगला असून, महागाईचा दर कमी होत आहे. परंतु, तरीही तो उद्दिष्टापेक्षा खूप जास्त आहे. ग्राहकांच्या खर्चाचा वेग मंदावला असला, तरी त्याचे प्रमाण अधिक आहे, तो आणखी कमी करण्याची गरज आहे, तरच महागाई नियंत्रणात येईल. जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता कायम असल्याने घाईघाईने दर कमी केल्याने महागाई पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्याजदर कमी न करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

- जेरोम पॉवेल, अध्यक्ष, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT