Interim Budget 2024 Date, time and where to watch FM Sitharaman's speech live  Sakal
Personal Finance

Budget 2024: अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Union Budget 2024 LIVE updates: गुरुवारी, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल.

राहुल शेळके

Budget 2024: गुरुवारी, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल.

एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर केंद्रात स्थापन होणारे नवीन सरकार 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. (The budget will be ‘interim’ in nature as the government is set to face a general election in April-May this year.)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत. मोठ्या घोषणांसाठी पूर्ण अर्थसंकल्प येईपर्यंत वाट पाहावी लागेल, असे त्या म्हणाल्या होत्या. नवीन अर्थसंकल्प जुलैमध्ये येणे अपेक्षित आहे. (Interim Budget 2024 Free Live Streaming)

2024 चा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाईल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प 2024 लोकसभेत सादर करणार आहेत. 1999 पासून केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जात आहे.

पूर्वी अर्थसंकल्प सायंकाळी 5 वाजता सादर होत असे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2017 मध्ये पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून अर्थसंकल्प दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जातो.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून म्हणजे उद्या सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. (The budget session is starting from January 31)

साधारणपणे आर्थिक सर्वेक्षण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर केले जाते. त्यात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीची सर्वसमावेशक माहिती असते. यावेळी आर्थिक पाहणीचे स्वरूप अतिशय संक्षिप्त आहे. पूर्ण अर्थसंकल्प सादर करताना सरकार संपूर्ण आर्थिक सर्वेक्षण सादर करेल, अशी अपेक्षा आहे.

तुम्ही थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकता?

तुम्ही देशातील कोणत्याही वृत्तवाहिनीवर बजेटचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावरील कर सवलतीच्या मर्यादेत वाढ, महागाईपासून दिलासा, स्वस्त घरे, गृहकर्जाच्या व्याजदरात कपात, रोजगाराबाबत काही मोठ्या घोषणाही अपेक्षित आहेत. (watch the live broadcast)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT