Budget 2024 Sakal
Personal Finance

Budget 2024: एक कोटी तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप! मोदी सरकार आणणार महत्वाकांक्षी योजना

Union Budget 2024 Nirmala Sitharaman on Employment: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या NDA सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आणि त्यात करण्यात येणाऱ्या घोषणांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

राहुल शेळके

Employment Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या NDA सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आणि त्यात करण्यात येणाऱ्या घोषणांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात सरकार 1 कोटी तरुणांना मोठ्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देणार आहे. तसेच, 5,000 रुपयांच्या मासिक भत्त्यासह 12 महिन्यांची पंतप्रधान इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे. याशिवाय, बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

पंतप्रधान पॅकेज: 'रोजगार संबंधित प्रोत्साहन' अंतर्गत योजना जाहीर केल्या

योजना 'A': प्रथमच नोकरी शोधणारे

• प्रथमच EPFO ​​मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण.

योजना 'बी': उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मिती

• नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही त्यांच्या EPFO ​​योगदानानुसार थेट प्रोत्साहन दिले जाईल

उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा 30 लाख तरुणांना फायदा होणार असून अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत, सरकार EPFO ​​मध्ये योगदानासाठी नियोक्त्यांना दरमहा 3000 रुपये देईल. या योजनेचा लाभ 50 लाख लोकांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT