investment share market mutual fund ganesh chaturthi money management sakal
Personal Finance

बाप्पांकडून घेऊ गुंतवणुकीचे धडे !

श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे आणि कोणतेही नवे काम सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे नाव घेणे शुभ मानले जाते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. वीरेंद्र ताटके

गणेशाोत्सवानिमित्त उद्या घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे आणि कोणतेही नवे काम सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे नाव घेणे शुभ मानले जाते. आर्थिक नियोजनाची सुरुवात करतानादेखील गणपती बाप्पांना वंदन करावे आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपण बाप्पांकडून पुढील गोष्टी शिकू शकतो.

बुद्धीचा योग्य वापर करा

श्रीगणेशाचे मस्तक हत्तीचे असते आणि ते बुद्धीचे प्रतीक मानले जाते. आपल्या डोक्याचा योग्य वापर करून कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, हे आपल्याला बाप्पांकडून शिकता येते. एक गुंतवणूकदार म्हणून आपण आपल्या बुद्धीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे, हे आपल्याला यातून शिकता येते.

कोणत्याही गुंतवणूक पर्यायामध्ये रक्कम गुंतवण्यापूर्वी त्यामधील सर्व पैलू व्यवस्थित जाणून आणि समजून घेतले पाहिजेत; तसेच वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे. आपल्या बुद्धीचा योग्य वापर न करता आणि पुरेशा माहितीशिवाय गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते.

बहुश्रुत व्हा !

गणपती बाप्पांचे कान आकाराने खूप मोठे असतात. त्यामुळे त्याला सूपकर्ण असेही म्हणतात. यातून गणेश आपल्याला संदेश देतात, की आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी बारकाईने ऐका आणि मगच अंतिम निर्णय घ्या. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूकदार म्हणून आपण जेवढे बहुश्रुत होऊ तेवढे अधिक ज्ञान आपल्याला मिळेल. अर्थात, कानावर पडणाऱ्या प्रत्येक बातमीने आपण विचलित होऊ नये, यासाठीदेखील आपल्या बुद्धीचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे.

ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा

श्रीगणेशांनी महर्षी व्यास यांच्यासोबत अविश्रांतपणे कष्ट घेऊन महाभारत हे महाकाव्य पूर्ण केले. यावरून गणपती बाप्पांचे आपल्या ध्येयावर लक्ष किती केंद्रित असते, याची कल्पना येऊ शकते. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीदेखील आपले ध्येय पक्के करून त्या दिशेने सातत्याने वाटचाल करणे आवश्यक असते. आर्थिक ध्येय निश्चित नसेल, तर आपले आर्थिक नियोजनदेखील नीट होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.

मनःशांती जपा

गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्नता आणि शांत भाव असतात आणि मुद्रादेखील प्रसन्न असते. यशस्वी गुंतवणूकदाराकडेसुद्धा हे गुण असणे आवश्यक असते. आर्थिक जगात होणाऱ्या चढ-उतारांमुळे मन विचलित होऊ न देता आपण कायम प्रसन्नमनाने लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे. गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी मनाची शांतता आणि प्रसन्नता खूप आवश्यक असते. निराश मनाने आणि नकारात्मक भावनेने केलेली गुंतवणूक अयशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, हे लक्षात ठेवावे.

उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पांचे वर नमूद केलेले अंगभूत गुण डोळ्यांसमोर ठेवून आर्थिक वाटचाल केली, तर आर्थिक भरभराटीचा मोदक आपल्याला प्रसाद म्हणून नक्की मिळेल !

(लेखक इंदिरा ग्लोबल स्कूल ऑफ बिझनेस, पुणे येथे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT