Aditya L1 Mission Sakal
Personal Finance

Aditya L1 Mission: आदित्य एल-1 मोहिम यशस्वी झाल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा होणार फायदा?

Aditya L1 Mission: भारताने अवघ्या 400 कोटींच्या बजेटमध्ये आदित्य एल1 तयार केला आहे.

राहुल शेळके

Aditya L1 Mission: आदित्य L1 अंतराळात जाण्यासाठी सज्ज आहे. आज, शनिवार, 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान 3 प्रमाणे इस्रोने सौर मोहीमेचे बजेट चीन आणि अमेरिकेपेक्षा कमी ठेवले आहे.

त्यामुळे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इस्रोच्या सौर मोहीमेच्या बजेटची चर्चाही जगभरात होत आहे. भारताने अवघ्या 400 कोटींच्या बजेटमध्ये आदित्य एल1 तयार केला आहे. जर भारत आपल्या सौर मोहीमेमध्ये यशस्वी झाला तर इस्रो आणि देशाची मान उंचावेल. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

आदित्य L1 मोहीमेच बजेट किती?

आदित्य L1 मोहीम ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) मोठा प्रकल्प आहे. हे सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरील थराचा अभ्यास करेल. इंडिया टाइम्स आणि हिंदुस्तान टाईम्सच्या मते, मिशनचे बजेट सुमारे 400 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, या पैशाचा वापर अंतराळयानाची रचना, विकास, प्रक्षेपण आणि ऑपरेशनसाठी करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेला असा होईल फायदा

भारताच्या चांद्रयान 3 च्या यशानंतर आणि सौर मोहीमेनंतर, अशी अपेक्षा आहे की संपूर्ण जग अशा किफायतशीर बजेटमध्ये अंतराळ मोहिमा सुरू करण्यासाठी भारताशी हातमिळवणी करतील. भारताच्या या क्षमतेचा फायदा अनेक मोठे देश घेऊ शकतात. इस्रो आता व्यावसायिक लॉन्चिंगसाठी देखील पावले उचलत आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळेल.

स्टार्टअपला चालना मिळेल

सध्या भारत सरकार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे. देशातील अंतराळ आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक स्टार्टअप्सना याचा फायदा होऊ शकतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

इस्रोने प्रत्येक मोहिमेत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारताने कमी बजेटमध्ये सौर मोहिमेची योजना आखली आहे. आदित्य मिशनचा खर्च 400 कोटी रुपये आहे. सूर्य मोहिमेवर नासाने 12,300 कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजेच इस्रो पुन्हा जगात एक नवा विक्रम रचणार आहे.

विशेष म्हणजे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या चांद्रयानचे बजेट फक्त 615 कोटी रुपये होते. कमी खर्चात मोहीम यशस्वीपणे पार पाडण्याच्या भारताच्या क्षमतेचे अनेक देशांनी कौतुक केले आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर जगातील अनेक देश इस्रोसोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT