ITR Filing must-know things before filing income tax returns FY 23–24 Marathi News  
Personal Finance

ITR Filing Process : आयटीआर फाईल करताना कोणती काळजी घ्याल?

ITR filing process 2023-24 : देशातील सर्व करदात्यांना दरवर्षी प्राप्तिकर विवरण (आयटीआर) भरणे क्रमप्राप्त आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरण्याची अंतिम मुदत आहे.

रोहित कणसे

नवी दिल्ली : देशातील सर्व करदात्यांना दरवर्षी प्राप्तिकर विवरण (आयटीआर) भरणे क्रमप्राप्त आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरण्याची अंतिम मुदत आहे. फॉर्म १६ प्राप्त केल्यानंतर आयटीआर दाखल करणे हे अनेकांना आव्हानात्मक वाटते. त्यामुळे ते सीए वा कर सल्लागारांकडून हे काम करून घेतात. काही जण स्वतः आयटीआर दाखल करताना नकळत काही चुका करतात. परिणामी त्यांना कधी परतावा मिळत नाही, तर काही जणांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीसही मिळते. त्यामुळे आयटीआर दाखल करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, काय काळजी घ्यायला हवी, याबाबत...

१. योग्य माहिती भरा

आयटीआर दाखल करताना तुमची वैयक्तिक माहिती उदा. नाव, पॅन क्रमांक, बँक खातेक्रमांक आदी अचूक भरावे. यात चूक झाल्यास प्राप्तिकर परतावा मिळताना अडचणी येऊ शकतात.

२. योग्य अर्ज निवडा

उत्पन्नाचे स्रोत आणि प्रकारानुसार, आयटीआर अर्ज निवडावा लागतो. चुकीचा अर्ज निवडल्यास तो स्वीकारला जात नाही किंवा पुन्हा भरावा लागतो. उदा. नोकरदारवर्गांनी आयटीआर-१, तर व्यावसायिकांनी आयटीआर-४ अर्ज भरावा.

३. उत्पन्नाची अचूक माहिती देणे

वेतन, व्याज, घरभाडे वा अन्य स्रोताद्वारे मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाची माहिती आयटीआर दाखल करताना भरणे क्रमप्राप्त आहे. चुकीची माहिती दाखल केल्यास तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो.

४. वजावट व सवलतीची माहिती द्या

करदात्यांना ८० सी, ८० डी आदी कलमांद्वारे काही सवलती मिळत असल्यास वा उत्पन्नातून ठराविक रकमेची वजावट होत असल्यास त्याबाबतची अचूक माहिती आयटीआरमध्ये द्यावी. ती चुकल्यास योग्य कर परतावा मिळत नाही.

५. आयटीआर अर्जाची पडताळणी करा

ऑनलाईन पद्धतीने आयटीआर दाखल केल्यानंतर त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. ती पडताळणी न केल्यास तुमचा अर्ज अमान्य होतो. त्यामुळे संपूर्ण अर्ज भरल्यानंतर पडताळणी निश्चित करा.

६. मुदतीत आयटीआर दाखल करा

निर्धारित मुदतीत आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला एक हजार ते १० हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय वजावट वा सवलतीपासून वंचित रहावे लागू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT