ITR verification last day 2023 Sakal
Personal Finance

ITR Verification: आयटीआर व्हेरिफिकेशन करण्याचा आज शेवटचा दिवस, न केल्यास...

ITR verification last day 2023: तुम्ही आयटीआर व्हेरिफिकेशन केले नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

राहुल शेळके

ITR verification last day 2023: आयकर रिटर्न भरल्यानंतर, पुढचा टप्पा म्हणजे आयटीआर व्हेरिफिकेशन. कोणत्याही दंडाशिवाय ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै रोजी संपली आणि करदात्यांना ते दाखल केल्याच्या तारखेपासून त्यांचे फॉर्म व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक महिना होता.

तो एक महिना जवळपास संपत आला आहे. तुम्ही आयटीआर व्हेरिफिकेशन केले नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

आयकर विभागाने दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात एक ट्विटही केले होते. ज्यामध्ये असे लिहिले होते की प्रिय करदात्यांनो, रिटर्न भरल्यानंतर 30 दिवसांच्या आत तुमचा आयटीआर व्हेरिफिकेशन करण्याचे लक्षात ठेवा. उशीर करू नका, आजच तुमचे ITR व्हेरिफिकेशन करा!

ITR व्हेरिफिकेशन का आवश्यक आहे?

ई-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा आयटीआर ई-व्हेरिफाइड मानला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही पात्र असल्यास, तुम्हाला परतावा मिळेल. जर तुम्ही आयटीआर व्हेरिफिकेशन अंतिम मुदत चुकवली असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

आयटी विभागाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही मुदतीच्या आत आयटीआरची पडताळणी करू शकला नाही, तर तुमचा आयटीआर रद्द केला जाईल आणि 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.

आयटीआरची व्हेरिफिकेशन कसे करावे?

तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर आधार नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP पाठवून ITR व्हेरिफिकेशन करू शकता. याशिवाय, नेटबँकिंग आणि ऑफलाइन मोडद्वारे देखील ITR व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते.

आधार OTP द्वारे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यानंतर 'ई-व्हेरिफाय रिटर्न' वर जावे लागेल. आता तुम्हाला ज्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करायचे आहे ते माध्यम निवडा आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT