जेट एअरवेजची मालकी ‘जालान कॅलरॉक’कडे Sakal
Personal Finance

Jet Airways : जेट एअरवेजची मालकी ‘जालान कॅलरॉक’कडे; ‘एनसीएलएटी’च्या खंडपीठाचा निर्णय

दिवाळखोरी अपीलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) जेट एअरवेजची मालकी ‘जालान कॅलरॉक कन्सोर्टियम’कडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिवाळखोरी अपीलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) जेट एअरवेजची मालकी ‘जालान कॅलरॉक कन्सोर्टियम’कडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. ‘एनसीएलएटी’च्या खंडपीठाने जेट एअरवेजच्या देखरेख समितीला ९० दिवसांच्या आत हे मालकी हस्तांतरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याशिवाय, जेट एअरवेजच्या कर्जदारांना या कन्सोर्टियमने दिलेले १५० कोटी रुपये बँक हमी म्हणून समायोजित करण्याचेही आदेश दिले आहेत. जेट एअरवेज आणि जालान कॅलरॉक कन्सोर्टियमला (जेकेसी) कर्ज देणाऱ्या बँका दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेजचे हस्तांतर होण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ कायदेशीर संघर्ष करत आहेत.

यापूर्वी, कर्जदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाला या प्रकरणावर निर्णय देण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT