Jio World Plaza India's largest luxe mall opens its doors on November 1  Sakal
Personal Finance

Jio World Plaza: भारतातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल 1 नोव्हेंबर पासून होणार सुरु

Jio World Plaza: रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल उघडणार आहे.

राहुल शेळके

Jio World Plaza: रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल उघडणार आहे. 'Jio World Plaza' नावाचा कंपनीचा हा मॉल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 7,50,000 स्क्वेअर फूट परिसरात आहे.

या मॉलमध्ये बुल्गारी, कात्याय, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी, संदीप खोसला, पॉटरी बार्न आणि इतर अनेक महागडे ब्रँड्स उपलब्ध असतील. हे बुल्गारीचे भारतातील पहिले स्टोअर असेल.

सध्या भारतात काही मोजकेच मॉल्स आहेत जिथे फक्त आलिशान आणि महागड्या वस्तू मिळतात. यामध्ये डीएलएफ एम्पोरियो, चाणक्य मॉल, यूबी सिटी आणि पॅलेडियम यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारतात महागड्या वस्तूंकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. तज्ञांच्या मते, कोविड नंतरच्या काही वर्षांत त्यांची मागणी लक्षणीय वाढली आहे.

CBRE मधील रिटेल प्रमुख (इंडिया) विमल शर्मा म्हणाले की, “भारतातील लोक आता पहिल्या सारखे राहिले नाहीत जे फक्त परदेशात एक्सप्लोर करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जात होते. आता ते भारतातही महागड्या वस्तू खरेदी करत आहेत.

भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मालाच्या किंमतीतील तफावतही कमी झाली आहे.

स्टॅटिस्टाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये देशातील महागड्या वस्तूंची बाजारपेठ 7.74 अब्ज डॉलर्सची होती. त्याचा आकार वार्षिक आधारावर 1.38 टक्के (CAGR 2023-2028) दराने वाढण्याचा अंदाज आहे. आकडेवारीनुसार, भारतातील महागड्या वस्तूंमध्ये लक्झरी घड्याळे आणि दागिने यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT