Job Crisis in America  Sakal
Personal Finance

US Jobs: अमेरिकेत 87 लाख लोक एकपेक्षा जास्त नोकऱ्या करत आहेत; देशात नेमकं काय घडतयं?

US Jobs: अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जगभरातील लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत जातात. पण अमेरिकेचे कर्ज काही काळापासून वाढत आहे. देशातील जनता महागाईने हैराण झाली आहे.

राहुल शेळके

US Jobs: अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जगभरातील लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत जातात. पण अमेरिकेचे कर्ज काही काळापासून वाढत आहे. देशातील जनता महागाईने हैराण झाली आहे. अनेक वर्षांपासून लोकांच्या पगारात वाढ झालेली नाही, तर या काळात महागाई लक्षणीय वाढली आहे.

सप्टेंबरमध्ये एकापेक्षा जास्त नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या विक्रमी 86.6 लाखांवर पोहोचली आहे. ही संख्या कोरोना पूर्वीच्या तुलनेत 300,000 अधिक आहे आणि 2008पेक्षा 600,000 अधिक आहे.

एवढेच नाही तर अमेरिकेतील अर्धवेळ नोकरीच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत 30 दशलक्षने वाढ झाली आहे. तीन वर्षांचा हा विक्रम 2.82 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून पूर्णवेळ नोकऱ्यांमध्ये 10 लाखांहून अधिक घट झाली आहे, ही चिंतेची बाब आहे.

US Jobs

अमेरिकेत महागाई शिगेला पोहोचली आहे. लोकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. यामुळेच त्यांना एकापेक्षा जास्त ठिकाणी काम करावे लागत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, महागाईचा दर कमी होऊनही देशातील वस्तूंच्या किमतीत कोणतीही घट झालेली नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या अमेरिकन जनतेला महागाईपासून मुक्ती मिळण्याची आशा नाही.

US Jobs
अमेरिकेच्या कर्जात मोठी वाढ

अमेरिकेचे कर्ज 35 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. हे देशाच्या GDP च्या 127% आहे. अमेरिकेचा जीडीपी 28.6 ट्रिलियन डॉलर आहे. गेल्या एका वर्षात अमेरिकेचे कर्ज 2.2 ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. तर या काळात देशाची अर्थव्यवस्था 1.6 ट्रिलियन डॉलरने वाढली आहे.

जुलै 2024 च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील प्रत्येक नागरिकावर 1,04,507 डॉलरचे कर्ज आहे. परिस्थिती अशी झाली आहे की अमेरिकेला दररोज दोन अब्ज डॉलर्स व्याजासाठी खर्च करावे लागतात. पुढील दशकात देशाचे कर्ज 54 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopal Badne : मोठी बातमी ! सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिस ठाण्यात हजर, म्हणाला- मी प्रामाणिक....

भारताची नवी ‘फुलराणी’

Sunday Morning Breakfast Recipe: रविवारी सकाळच्या नाश्त्यात बनवा 'बटाटा मसाला पुरी', लगेच लिहून घ्या रेसिपी

आजचे राशिभविष्य - 26 ऑक्टोबर 2025

स्वागत नव्या पुस्तकांचे

SCROLL FOR NEXT