Jobs For Freshers Sakal
Personal Finance

Jobs For Freshers: फ्रेशर्ससाठी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध; 'या' तीन क्षेत्रात सर्वाधिक मागणी

Jobs For Freshers: तरुणांची अनेकदा तक्रार असते की बाजारात फ्रेशर्ससाठी नोकऱ्या नाहीत, पण एका अहवालात असे दिसून आले आहे की सॉफ्टवेअर इंजिनीअर, सिस्टम इंजिनीअर आणि प्रोग्रामिंग ॲनालिस्टच्या नोकऱ्या फक्त नवीन पदवीधरांसाठी आहेत.

राहुल शेळके

Jobs For Freshers: तरुणांची अनेकदा तक्रार असते की बाजारात फ्रेशर्ससाठी नोकऱ्या नाहीत, पण एका अहवालात असे दिसून आले आहे की सॉफ्टवेअर इंजिनीअर, सिस्टम इंजिनीअर आणि प्रोग्रामिंग ॲनालिस्टच्या नोकऱ्या फक्त नवीन पदवीधरांसाठी आहेत. भारतात फ्रेशर्ससाठी संधींची कमतरता नसल्याचे अहवालात सांगण्यात आले.

सॉफ्टवेअर इंजिनीअर, सिस्टम इंजिनीअर आणि प्रोग्रामिंग ॲनालिस्ट हे देशातील टॉप तीन नोकऱ्यांपैकी आहेत. ज्यासाठी नवीन पदवीधरांना सर्वाधिक मागणी आहे. लिंक्डइन प्रोफेशनल नेटवर्कने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात सांगण्यात आले की डिझाईन, ॲनालिस्ट आणि प्रोग्रामिंग अशी कौशल्ये असलेल्या फ्रेशर्सना सर्वाधिक मागणी आहे.

हायब्रीड नोकऱ्यांमध्ये 52 टक्के वाढ

वार्षिक आधारावर नोकऱ्यांमध्ये 15 टक्के घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याच वेळी, हायब्रीड नोकऱ्यांमध्ये 52 टक्के वाढ दिसून आली आहे. अहवालात असे नमूद केले आहे की युटिलिटी हा बॅचलर पदवी असलेल्या तरुण व्यावसायिकांसाठी वेगाने वाढणारा उद्योग आहे. याशिवाय, तेल, गॅस आणि खाणकाम, रिअल इस्टेट आणि ग्राहक सेवांमध्ये नवीन पदवीधरांसाठी नोकऱ्या वेगाने वाढत आहेत.

ज्या लोकांकडे बॅचलर डिग्री नाही, त्यांच्याकडे नोकरीच्या भरपूर संधी आहेत. ज्यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि मीडिया क्षेत्राचा समावेश आहे, त्यांना सॉफ्टवेअर, सेक्रेटरी आणि डिझाइन इंजिनीअर या पदांवर नोकरी मिळू शकते. सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि डेटा ॲनालिस्टच्या पदांवरही पदव्युत्तर पदवीधारकांची नियुक्ती केली जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एआयमुळे नोकऱ्या वाढत आहेत

लिंक्डइन करिअर एक्सपर्ट आणि इंडिया सीनियर मॅनेजिंग एडिटर, निर्जिता बॅनर्जी म्हणतात की आज अनेक स्किल्स इंडस्ट्रीजमध्ये ट्रान्सफर करण्यायोग्य आहेत. एआयच्या आगमनाने, तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्या अनेक क्षेत्रात वाढत आहेत. या कारणास्तव, कंपन्या विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले व्यावसायिक शोधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT