Johnson and Johnson proposes 6.5bn dollar deal to settle talc cancer lawsuits  Sakal
Personal Finance

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने जाहीर केले की ते अमेरिकेतील हजारो खटले निकाली काढण्यासाठी पुढील 25 वर्षांत 6.5 अब्ज डॉलर देतील. टॅल्क बेबी पावडरमुळे कर्करोग होतो असा दावा करणाऱ्या खटल्यांमध्ये कंपनी हे पैसे देणार आहे.

राहुल शेळके

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने जाहीर केले की ते अमेरिकेतील हजारो खटले निकाली काढण्यासाठी पुढील 25 वर्षांत 6.5 अब्ज डॉलर देणार आहे. टॅल्कम बेबी पावडरमुळे कर्करोग होतो असा दावा करणाऱ्या खटल्यांमध्ये कंपनी हे पैसे देणार आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये आरोप करण्यात आला आहे की त्यांच्या टॅल्कम बेबी पावडरमुळे गर्भाशयाचा कर्करोग आणि मेसोथेलियोमा होतो.

हे खटले निकाली काढण्यासाठी कंपनीने उपकंपनीची पुनर्रचना करण्यास सांगितले. यावेळी कंपनीच्या प्लॅनमध्ये 3 महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला होता. यावेळी, गर्भाशयाच्या कर्करोगाचे दावेदार या योजनेच्या बाजूने आणि विरोधात मतदान करू शकतात. 75% दावेदारांनी बाजू घेतल्यास, उपकंपनी दिवाळखोरी दाखल करू शकते.

पीडितांशी न्यायालयाबाहेर समझोता करण्याची इच्छा

कंपनीच्या विरोधात असे 60 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत ज्यात दावा करण्यात आला आहे की कंपनीने तयार केलेल्या बेबी पावडरच्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो. या दावेदारांना पैसे देण्यासाठी कंपनीला तिच्या एका उपकंपनीला दिवाळखोरी जाहीर करायची आहे.

जेणेकरून पीडितांशी न्यायालयाबाहेर समझोता करून प्रकरण निकाली काढता येईल. मात्र, त्यांच्या पावडरमध्ये काही दोष असल्याचे कंपनीने अद्याप मान्य केलेले नाही आणि त्यामुळे कर्करोग झाल्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी प्रोडक्ट्सच्या वापरामुळे कॅन्सर झाल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही जॉन्सनने या सर्वांविरुद्ध अनेक प्रदीर्घ कायदेशीर लढाया लढल्या आहेत. त्यामुळे जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाच्या मागणीत पूर्वीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने ऑगस्ट 2023 पर्यंत बेबी पावडरचे उत्पादन पूर्णपणे थांबवणार असल्याचे सांगितले होते.

गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 'द गार्डियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यूएस ड्रग कंट्रोल एजन्सीच्या विशेष तपासणीत जॉन्सनच्या बेबी पावडरचा नमुना घेण्यात आला होता. तपासणीअंती त्यात कार्सिनोजेनिक क्रायसोटाइल फायबर आढळून आले. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT